"ती मॅरेज मटेरियल", लग्नानंतर सुरुचीबद्दल पहिल्यांदाच बोलला पियुष रानडे, म्हणाला, "मी तिला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 11:22 IST2023-12-20T11:21:16+5:302023-12-20T11:22:04+5:30

पियुष रानडेबरोबर लग्नगाठ बांधत सुरुचीने तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. लग्नानंतर पहिल्यांदाच पियुषने एका मुलाखतीत सुरुचीबद्दल भाष्य केलं आहे. 

piyush ranade talk about his wife suruchi adarkar said she is complete marriage material | "ती मॅरेज मटेरियल", लग्नानंतर सुरुचीबद्दल पहिल्यांदाच बोलला पियुष रानडे, म्हणाला, "मी तिला..."

"ती मॅरेज मटेरियल", लग्नानंतर सुरुचीबद्दल पहिल्यांदाच बोलला पियुष रानडे, म्हणाला, "मी तिला..."

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सुरुची अडारकर नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली. सुरुचीने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. अभिनेता पियुष रानडेबरोबर लग्नगाठ बांधत सुरुचीने तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. लग्नानंतर पहिल्यांदाच पियुषने एका मुलाखतीत सुरुचीबद्दल भाष्य केलं आहे. 

सुरुची आणि पियुषने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लव्हस्टोरी, सिक्रेट वेडिंग याबाबत भाष्य केलं. पहिलं प्रपोज कोणी केलं होतं? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. "मी सुरुचीला कधी डेटसाठी किंवा चल फिरायला जाऊ, मग बघू असं नाही विचारू शकत. मी तिला सुरुची चल लग्न करूया, असं म्हणू शकतो. कारण, ती मॅरेज मटेरियल आहे. जर मला तिच्याबाबतीत खात्री आहे तर मी तिला लग्नासाठीच विचारेन," असं पियुष 'इट्स मज्जा'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला. 

पुढे तो म्हणाला, "मला कोणतंही रिलेशनशिप वगैरे या सगळ्या गोष्टी नको होत्या. लग्नवगैरे तर खूप पुढची गोष्ट...मी एकटाही आनंदी होतो. तिलाही या गोष्टी माहीत होत्या. आमच्यात प्रेम होतं, हे दोघांनाही माहीत होतं. पण, प्रेम आहे म्हणून लग्नच करायचंय असं आमच्यापैकी कुणीही केलं नाही. आम्ही आमचा वेळ घेतला. आजकाल आपण स्पेस हवी, असं फक्त म्हणतो. पण, सुरुचीने न सांगता मला ती दिली. सुरुचीला पहिल्यापासून लग्न करायचं होतं. पण, मला तिने वेळ दिला. काही वर्षांनंतर मग मी तिला लग्न करूया, असं सांगितलं." 

पियुष आणि सुरुचीने 'अंजली' मालिकेत एकत्र काम केलं होतं. तीन वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पियुषचं हे तिसरं लग्न आहे. त्याने शाल्मली तोळेबरोबर पहिलं लग्न केलं होतं. पण, काही वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. शर्वरी वाघशी पियुषने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली होती. पण, हे लग्नही फार काळ टिकलं नाही. 

Web Title: piyush ranade talk about his wife suruchi adarkar said she is complete marriage material