'पिंकीचा विजय असो'मधून मुख्य अभिनेत्रीने अचानक सोडली मालिका, आता तिच्या जागी या अभिनेत्रीची लागली वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 10:32 IST2023-08-16T10:17:07+5:302023-08-16T10:32:58+5:30

पिंकीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने मालिकेतून अचानक एक्झिट घेतली आहे. तिच्या जागाी दुसऱ्या अभिनेत्रीची वर्णी लागणार आहे.

Pinkincha vijay aso fame sharayu sonawane took exit from serial arti more will be seen as pinki | 'पिंकीचा विजय असो'मधून मुख्य अभिनेत्रीने अचानक सोडली मालिका, आता तिच्या जागी या अभिनेत्रीची लागली वर्णी

'पिंकीचा विजय असो'मधून मुख्य अभिनेत्रीने अचानक सोडली मालिका, आता तिच्या जागी या अभिनेत्रीची लागली वर्णी

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'पिंकीचा विजय असो'' ही प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे. मालिकेतील पिंकी या पात्राने प्रेक्षकांना आपलंस केलं आहे. सरपंच पिंकीचं डोकं कसं कुठे चालेल याचा काही नेम नसतो. प्रत्येक अडचणीच्या प्रसंगात पिंकी नव्याने मार्ग काढून सगळ्यांच्या कौतुकाला पात्र ठरते. आता या मालिकेबाबत एक बातमी समोर येते आहे. जी वाचून प्रेक्षक काहीसे नाराज होऊ शकतात. पिंकीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने मालिकेतून एक्झिट घेतली आहे. तिच्या जागाी दुसऱ्या अभिनेत्रीची वर्णी लागणार आहे.  

आतापर्यंत चुलबुली पण धाडसी संरपंचाची भूमिका अभिनेत्री शरयू सोनावणं साकारात होती. मात्र आता ती या प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. शरयू सोनावणे उत्तम नृत्यांगणा असून ती पिंकीचा विजय असो या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तिला नृत्याची आवड आहे. तिने भरत नाट्यमचे धडे गिरवले आहेत. डान्सच्या निमित्ताने तिचे महाराष्ट्रभर दौरे सुरु असतात. ती ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांच्यासोबत यशोदा-कृष्ण बॅले करायची ज्यात तिने नृत्यामधून कृष्ण साकारला आहे. आता मालिकेत शरयूची भूमिका अभिनेत्री आरती मोरे साकारणार आहे.


आरतीनं 'यशोदा गोष्ट श्यामच्या आईची' मालिकेत मोठ्या यशोदेची प्रमुख भुमिका साकारली होती. या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यानंतर आता आरती पिंकीचा विजय असो मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

आरतीनं याआधी 'स्वप्नांच्या पलिकडले', 'जय मल्हार', 'कुसूम' यासारख्या मालिकेत काम केलं आहे.  उमेश कामत सोबत 'दादा एक गुड न्यूज आहे' सारख्या नाटकात देखील आरती महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

Web Title: Pinkincha vijay aso fame sharayu sonawane took exit from serial arti more will be seen as pinki