'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतील अभिनेता अडकला लग्नाच्या बेडीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 17:32 IST2023-05-17T17:32:17+5:302023-05-17T17:32:55+5:30
मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहे. दरम्यान आता छोट्या पडद्यावरील आणखी एका कलाकाराने लग्न केले आहे.

'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतील अभिनेता अडकला लग्नाच्या बेडीत
मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहे. हार्दिक जोशी-अक्षया देवधर, बाळूमामा फेम सुमित पुसावळे, अक्षर कुलकर्णी यांसारखे अनेक कलाकार लग्न बंधनात अडकले. लग्नाची बेडी फेम राघव म्हणजेच अभिनेता संकेत पाठकनेही मागील महिन्यात लग्न केले. आता छोट्या पडद्यावरील आणखी एका कलाकाराने लग्न केले आहे. फुलाला सुगंध मातीचा (Phulala Sugandh Maticha) या मालिकेतील कलाकार लग्न बेडीत अडकला आहे. हा अभिनेता म्हणजे आकाश पाटील(Akash Patil). त्याच्या लग्नाला त्याच्या मालिकेतील सहकलाकारांसोबतच इतर सेलिब्रेटींनीही हजेरी लावली होती.
फुलाला सुगंध मातीचा मालिकेनं काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत तुषारची भूमिका अभिनेता आकाश पाटीलने साकारली होती. आकाश पाटील हा चित्रपट, मालिका अभिनेता आहे. फुलाला सुगंध मातीचा मालिकेमुळे आकाश प्रकाशझोतात आला. नुकताच आकाश पाटीलने शमिका साळवी सोबत सातफेरे घेतले आहेत.
आकाशच्या लग्नाच्या दोनच दिवसांपूर्वी त्याचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर लग्न झाले. सोशल मीडियावर आकाशने आपल्या साखरपुडा, हळद आणि लग्नाचे काही क्षण शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून भरपूर प्रेमाचा वर्षाव होत आहे.
आकाश पाटील बद्दल सांगायचे तर तो एक उत्तम अभिनेता आहे. टकाटक या चित्रपटातून त्याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. यात तो सहाय्यक भूमिकेत दिसला होता. एबी आणि सीडी, हृदयी वसंत फुलताना या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. फुलाला सुगंध मातीचा या मालिकेमुळे आकाश दोन वर्षाहून अधिक काळ प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला. या मालिकेत तो पुढे नकारात्मक भूमिकेत दिसला.