सलमान खानच्या घरातील या व्यक्तीला ही वाटते शिल्पा शिंदेच व्हावी बिग बॉसची विजेती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 15:07 IST2018-01-11T09:37:18+5:302018-01-11T15:07:18+5:30

बिग बॉस 11 च्या ग्रँड फिनाले अवघे 2 दोन दिवस उरले आहेत. कोण जिंकणार बिग बॉसचा 11 चा ताज ...

This person of Salman Khan's family feels Shilpa Shinde will win the Big Boss winner | सलमान खानच्या घरातील या व्यक्तीला ही वाटते शिल्पा शिंदेच व्हावी बिग बॉसची विजेती

सलमान खानच्या घरातील या व्यक्तीला ही वाटते शिल्पा शिंदेच व्हावी बिग बॉसची विजेती

ग बॉस 11 च्या ग्रँड फिनाले अवघे 2 दोन दिवस उरले आहेत. कोण जिंकणार बिग बॉसचा 11 चा ताज याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. आकाश ददलानी आऊट झाल्या नंतर घरात चार फायनल कंटेस्टेंट उरले आहेत. हिना खान, विकास गुप्ता, शिल्पा शिंदे आणि पुनीश शर्मा. सोशल मीडियावर आपल्या आवडत्या कलाकाराला सपोर्ट करण्यासाठी फॅन्स अॅक्टिव्ह पण झाले आहेत. सोशल मीडियावर बिग बॉसच्या विनरच्या वोटिंगला ट्रेंडमध्ये शिल्पा शिंदेचे नाव सगळ्यात वरती आहे. शिल्पाचे फॅन्स इतर कंटेस्टेंट पेक्षा जास्त आहेत यामध्ये दुम्मत नाही. शिल्पाच्या फॅन्स बद्दल बोलयाचे झाले तर सलमान खानच्या घरात सुद्धा सलमानची फॅन आहे. सलमान कोणाला सपोर्ट करतोय याचा खुलासा झाला नाही मात्र सलमानची आई शिल्पा शिंदेच्या परफॉर्मेंसवर खूप खूश आहे. 
बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार सलमानची आई वाटते आहे की या सीझनची विजेती शिल्पा शिंदे व्हावी. दरम्यान काही दिवसांपूर्वी वुई लव्ह शिल्पा शिंदे असा हॅशटॅगचा वापर करत तिच्या फॅन्सने अनेक ट्वीट केले होते. तिच्या फॅन्सने केलेल्या ट्वीटची संख्या एक दक्षलक्षाहून देखील जास्त आहे आणि त्यामुळेच वुई लव्ह शिल्पा शिंदे हा हॅशटॅग ट्विटरच्या ट्रेंडिंग मध्ये आला आहे. शिल्पा या पूर्वी देखील ट्विटरच्या ट्रेडिंग मध्ये आली होती. पण या वेळी तिच्या ट्विटरची संख्या ही दक्षलक्षाहून जास्त आहे. कोणताही टिव्ही कलाकार इतक्या ट्वीटमुळे ट्रेंडिंग मध्ये येण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि त्याचमुळे शिल्पा शिंदेने सोशल मीडियावर एक रेकॉर्ड रचला आहे.  

ALSO READ :  म्हणून ‘भाभीजी’ शिल्पा शिंदे लग्न न करता बॉयफ्रेंडपासून पळाली,आईनं सांगितली ठरलेलं लग्न मोडल्याची गोष्ट !

शिल्पा शिंदेने छोट्या पडद्यावर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण तिला खऱ्या अर्थाने भाभाजी घर पर है या मालिकेने लोकप्रियता मिळवून दिली. शिल्पा शिंदेने भाभीजी घर पर है या मालिकेत अंगुरी भाभीची व्यक्तिरेखा साकारली होती. तिच्या या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. 

Web Title: This person of Salman Khan's family feels Shilpa Shinde will win the Big Boss winner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.