पावनखिंड फेम अभिनेत्याची होणार 'जीव माझा गुंतला' मालिकेत दमदार एंट्री, जाणून घ्या याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 07:00 IST2022-08-24T07:00:00+5:302022-08-24T07:00:06+5:30

'जीव माझा गुंतला' मालिकेत नव्या अभिनेत्याची एंट्री होणार आहे, यामुळे अंतरा आणि मल्हारच्या आयुष्यात नवं संकट येणार आहे,

Pawankhind fame actor's take entry in the serial Jeev Maza Guntala | पावनखिंड फेम अभिनेत्याची होणार 'जीव माझा गुंतला' मालिकेत दमदार एंट्री, जाणून घ्या याविषयी

पावनखिंड फेम अभिनेत्याची होणार 'जीव माझा गुंतला' मालिकेत दमदार एंट्री, जाणून घ्या याविषयी

कलर्स मराठीवरील 'जीव माझा गुंतला' मालिकेने अल्पावधीतच  संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले. रिक्षावाली अंतरा आणि बीझनेस मॅन मल्हार यांची आगळीवेगळी गोष्ट प्रेक्षकांना पसंत पडली. जीव माझा गुंतला मालिकेत अंतरा आणि मल्हारच्या नात्याला अनेक वळण आली. दोघांनी कठीण परिस्थितीला खंबीरपणे तोंड दिले. अनेक कसोट्या पार पाडल्या. अंतरा आणि मल्हारच्या विरोधात बरीच कटकारस्थानं आतापर्यंत चित्रा काकी, काका आणि श्वेता मिळून रचत आले पण आता मात्र यांच्या आयुष्यात मेघ हे नवं संकट पुढ्यात येऊन ठाकलं आहे. मालिकेत एका नव्या अभिनेत्याची एंट्री होणार आहे.

'जीव माझा गुंतला' मालिकेत अभिनेता बिपीन सुर्वे एंट्री होणार आहे. तो मेघ नावाची भूमिका साकारणार आहे. आपल्या भूमिकेविषयी सांगताना बिपीन म्हणाला, जीव माझा गुंतला” या मालिकेमधून एका अनोख्या आणि दमदार भूमिकेमध्ये मेघ खानविलकर म्हणून मी तुमच्या भेटीला येतो आहे. खूप मोठी जबाबदारी आहे असं मला वाटतं. ज्या पद्धतीने हे पात्र समजावून त्याचे महत्त्व सांगितल गेलं, ह्या नकारात्मक पात्राची त्याच्या कुटुंबाशी असलेली द्वेषाची भावना, भावाबद्दल सुडाची भावना ह्या सगळ्या गोष्टींमुळे भूमिकेचा प्रेमात पडलो आणि लगेच तयार झालो.

 मेघ या पात्राबद्दल जेव्हा मला विचारलं गेलं , त्याच दरम्यान मला काही ठिकाणी प्रमुख आणि सकारात्मक भूमिकेसाठी सुधा विचारलं गेलं होतं आणि मी सुध्दा चांगल्या संधीच्या शोधात होतो,  मेघ खानविलकर या पात्राची ऑडिशन देत असतानाच मी स्वतःच त्या पात्राच्या प्रेमात पडलो, कारण ऑडिशन script मध्येच इतकी छान मजा मांडली होती. हे पात्र नकारात्मक जरी असल तरी ते सकारत्मकतेन तुम्हाला आवडेल असाच माझा आणि टीमचा प्रयत्नं असेल”.

 

 

Web Title: Pawankhind fame actor's take entry in the serial Jeev Maza Guntala