Indian Idol 12 : पवनदीप विजेता? फोटो पाहून चाहते हैराण, जाणून घ्या ‘त्या’ फोटो मागचं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 18:39 IST2021-08-15T18:38:44+5:302021-08-15T18:39:13+5:30
Indian Idol 12 Grand Finale Winner: : ‘इंडियन आयडल 12’ची ट्रॉफी कोण जिंकणार? याचं उत्तर काहीच तासांत मिळणार आहे. पण...

Indian Idol 12 : पवनदीप विजेता? फोटो पाहून चाहते हैराण, जाणून घ्या ‘त्या’ फोटो मागचं सत्य
‘इंडियन आयडल 12’ची (Indian Idol 12) ट्रॉफी कोण जिंकणार? (Indian Idol 12 Grand Finale) याचं उत्तर काहीच तासांत मिळणार आहे. पण त्याआधीच इंडियन आयडलची ट्राफी आणि 25 लाखांचा चेक घेतलेला पवनदीप राजनचा (Pawandeep Rajan) फोटो पाहून चाहते हैराण आहेत. होय, त्याचा हा फोटो प्रचंड व्हायरल होतोय. या फोटोमध्ये पवनदीप राजनच्या हातात इंडियन आयडल 12 ची ट्रॉफी आणि 25 लाखांचा चेक दिसून येतोय.
खरे तर पवनदीप पूर्वापार या शोच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जातोय. हा फोटो पाहून तर अनेकांनी त्याला शुभेच्छा देणेही सुरू केले आहे. तुम्हीही हा फोटो पाहून पवनदीपला शुभेच्छा देण्याच्या तयारीत असाल तर जरा थांबा....
कारण हा व्हायरल फोटो खोटा असल्याचे सांगितले जातेय. किंबहुना तो खोटा आहेच. होय, या फोटोला जरा निरखून पाहिल्यानंतर दिसेल की, पवनदीपच्या हातातल्या 25 लाख रुपयाच्या चेकवर जी तारीख दिली आहे ती 15 मे 2021 अशी आहे. त्यामुळे हा फोटो फसवा असल्याचे कळते.
या व्हायरल फोटोंवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. असे फोटोशॉप्ड फोटो पोस्ट करण्यात काही अर्थ नाही, अशा आशयाच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत.
पवनदीप राजन व अरूणिता कांजीलाल हे दोघे इंडियन आयडल 12 च्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. दोघांमध्येही अगदी काट्याची टक्कर आहे. काहींच्या मते, पवनदीपचे पारडे जरा जड आहे. काहींना मात्र यावेळी अरूणिताच शोची विजेती होणार, असा विश्वास व्यक्त केला आहे.
चर्चा खरी मानाल तर या सीझनमध्ये दोन स्पर्धक विजेते असण्याचीही शक्यता आहे. पवनदीप व अरूणिता यांनी स्वत: तसे संकेत दिले आहेत.
अर्थात खरा निकाल पाहिल्यानंतरच हे स्पष्ट होणार आहे. काहीच तासांत शोचा विजेता कोण असणार हे चाहत्यांना कळणार आहे.