काय सांगता! पवनदीप राजन- अरुणिता कांजीलालने गुपचूप उरकलं लग्न, जाणून घ्या व्हायरल फोटोंमागचं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 15:38 IST2021-12-18T15:32:29+5:302021-12-18T15:38:52+5:30
पवनदीप राजन (Pawandeep Rajan) आणि अरुणिता कांजीलाल (Arunita Kanjilal) शोमध्ये होते, तेव्हा त्यांच्या रिलेशनशीपच्या चर्चेत होत्या.

काय सांगता! पवनदीप राजन- अरुणिता कांजीलालने गुपचूप उरकलं लग्न, जाणून घ्या व्हायरल फोटोंमागचं सत्य
'इंडियन आयडॉल 12' (Indian Idol 12) चा विजेता पवनदीप राजन आणि शोची उपविजेती अरुणिता कांजीलाल हिने ब्रेकअप झाली खोटी अफवा पसरवली होती का? हा प्रश्न पडतो कारण या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून लोक त्यांचे खूप अभिनंदन करत आहेत. फोटो पाहता, असे दिसते की पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल हे दोघे लग्नाच्या बेडीत (Pawandeep-Arunita wedding pic)अडकले आहेत.
पवनदीप राजन (Pawandeep Rajan) आणि अरुणिता कांजीलाल (Arunita Kanjilal) शोमध्ये होते, तेव्हा त्यांच्या रिलेशनशीपच्या चर्चेत होत्या, ते दोघ मात्र फक्त चांगले मित्र असल्याचे सांगत होते, यापेक्षा जास्त काही नाही. पण सोशल मीडियावर व्हायरल होणार त्यांचे फोटो आणि व्हिडिओ पाहून लोक हे मानायला तयार नव्हते. दोघांचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघे वधू-वराच्या गेटअपमध्ये दिसतायेत.
वास्तविक, पालवदीप आणि अरुणिताच्या चाहत्यांनी त्यांचा एक फोटो एडिट करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोमध्ये दोघेही लग्नाचा हार घालून मिठी मारताना दिसत आहेत. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर बरेच लोक असा अंदाज लावत आहेत की खरचं या दोघांनी लग्न तर नाही केलं.
पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांच्या ब्रेकअपची बातमी यापूर्वी समोर आली होती, ज्यामुळे दोघांचे चाहते खूप निराश झाले होते. हे पाहता एका चाहत्याने हा कारनामा केला असून तो या जोडप्याच्या चाहत्यांना व्हिज्युअल ट्रीट देताना दिसतो आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की व्हायरल होत असलेला फोटो खोटा आहे. दोन्ही गायक अजून अविवाहीत आहेत आणि त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहेत.