"फक्त सोनाली बेंद्रेच वाचली...", 'पति पत्नी और पंगा'मध्ये सुनीता आहुजाने गोविंदाची केली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 10:55 IST2025-09-11T10:55:04+5:302025-09-11T10:55:55+5:30

कलर्स वाहिनीवरील 'पति पत्नी और पंगा - जोडियों का रियलिटी चेक' (Pati Patni Aur Panga Show) या शोच्या आगामी भागात गोविंदाची पत्नी सुनीता आहूजा (Sunita Ahuja) दिसणार आहे. यावेळी सुनीता स्पर्धक, शोचे होस्ट मुनव्वर फारुकी आणि सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) यांच्यासोबत खूप मजा करताना दिसणार आहे.

Pati Patni Aur Panga Show Sunita Ahuja revealed Govinda flirt he all co actress except Sonali Bendre | "फक्त सोनाली बेंद्रेच वाचली...", 'पति पत्नी और पंगा'मध्ये सुनीता आहुजाने गोविंदाची केली पोलखोल

"फक्त सोनाली बेंद्रेच वाचली...", 'पति पत्नी और पंगा'मध्ये सुनीता आहुजाने गोविंदाची केली पोलखोल

कलर्स वाहिनीवरील 'पति पत्नी और पंगा - जोडियों का रियलिटी चेक' (Pati Patni Aur Panga Show) या शोच्या आगामी भागात गोविंदाची पत्नी सुनीता आहूजा (Sunita Ahuja) दिसणार आहे. यावेळी सुनीता स्पर्धक, शोचे होस्ट मुनव्वर फारुकी आणि सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) यांच्यासोबत खूप मजा करताना दिसणार आहे. त्याचबरोबर ती स्टेजवर पती गोविंदा(Govinda)बद्दल काही मजेशीर गोष्टींचा खुलासाही करणार आहे.

शोदरम्यान सुनीता तिच्या पतीबद्दल एक असे गुपित उघड करते की, सगळे हसून लोटपोट होतात. सुनीता म्हणते की, ''गोविंदाने तिच्यासोबत काम करणाऱ्या जवळपास प्रत्येक अभिनेत्रीसोबत मज्जा म्हणून फ्लर्ट केले होते, पण सोनाली बेंद्रे एकमेव अशी अभिनेत्री होती, जिच्यासोबत त्याने कधीही फ्लर्ट केले नाही.'' हा खुलासा ऐकून सगळेच थक्क झाले आणि प्रेक्षक हसून लोटपोट झाले, तर सोनाली स्टेजवर लाजली.

सुनीताने गोविंदाच्या गाण्यांवर केला डान्स
सुनीताने गोविंदाची लाइफ-साईज स्टँडी आणून सर्वांना चकित केले, त्यानंतर सोनाली, सुनीता आणि स्पर्धकांनी 'मैं तो रस्ते से जा रहा था' या गाण्यावर डान्स केला. कॉमेडीला आणखी रंजक बनवत, सुदेश लहरी स्टँडीच्या मागे लपले आणि त्यांनी गोविंदाची नक्कल केली आणि अभिषेक कुमारला एक थप्पड मारली, ज्यामुळे वातावरणात आणखी मजा आली.


सुनीता आहूजाने गोविंदाला दिले रेटिंग
या शोमध्ये ईशा मालवीयने सुनीताला तिच्या पतीला रेटिंग देण्यास सांगितले. विसरण्याच्या सवयीसाठी ओळखल्या जाणाऱ्या गोविंदाला सुनीताने ७ गुण दिले. मात्र, जेव्हा सुनीताने गोविंदाच्या निष्ठेला रेटिंग दिली तेव्हा सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मजाकिया अंदाजात तिने गोविंदाला ६ गुण दिले, ज्यामुळे सर्वांना हसू आवरता आले नाही.

गोविंदा आणि सुनीता आहूजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा
काही काळापूर्वी गोविंदा आणि सुनीता आहूजा यांच्या घटस्फोटाच्या अफवा पुन्हा पसरल्या होत्या. मात्र, नंतर अभिनेत्याच्या वकिलाने आणि मॅनेजरने सांगितले की, त्या जुन्या गोष्टी होत्या आणि आता गोविंदा आणि सुनीता यांच्यात सर्वकाही ठीक आहे. त्यानंतर ही जोडी गणेशोत्सवादरम्यान एकत्र दिसली होती.

Web Title: Pati Patni Aur Panga Show Sunita Ahuja revealed Govinda flirt he all co actress except Sonali Bendre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.