'छोटी मालकीण' या मालिकेत रेवती घेणार या स्पर्धेत भाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 14:51 IST2018-05-17T09:21:55+5:302018-05-17T14:51:55+5:30
स्टार प्रवाहच्या ‘छोटी मालकीण’ या मालिकेत रेवती आणि श्रीधर यांच्यात आता हळवे नाते तयार होत आहे. शेतीच्या कामासाठी लागणारा ...
.jpg)
'छोटी मालकीण' या मालिकेत रेवती घेणार या स्पर्धेत भाग
स टार प्रवाहच्या ‘छोटी मालकीण’ या मालिकेत रेवती आणि श्रीधर यांच्यात आता हळवे नाते तयार होत आहे. शेतीच्या कामासाठी लागणारा स्प्रे घेण्यासाठी श्रीधरची धडपड सुरू आहे. त्यासाठी तो पैसे उभे करत आहे. श्रीधरच्या मदतीसाठी आता रेवतीही पुढे सरसावली आहे. गावातली पाककला स्पर्धा जिंकून रेवती श्रीधरला मदत करणार का, हे पाहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
स्प्रे घेण्यासाठी श्रीधरच्या कर्जाचा प्रस्ताव नामंजूर झाला आहे. त्यामुळे पैसे उभे करण्यासाठी त्याने स्वतःची बाईक विकली. सुमनने दागिने विकून पैसे दिले आहेत. सगळेजण श्रीधरला मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मग रेवतीलाही वाटते, की आपणही श्रीधरला मदत केली पाहिजे. अशातच गावातल्या सितारा महिला मंचातर्फे 'धमाल सासु-सुनेची, कमाल पाककलेची' ही स्पर्धा जाहीर होते. स्पर्धेच्या विजेत्याला एक लाखाचे पारितोषिक दिले जाणार असते. त्यात रेवती सहभागी होते. मात्र, त्या स्पर्धेत रेवतीची आई आणि अभिलाषाही सहभागी झालेल्या असतात. त्यामुळे आपल्या आईला हरवून रेवती ही स्पर्धा जिंकणार का, हे पाहाणे रंजक ठरणार आहे.
पाककला स्पर्धेत रेवती जिंकणार का? श्रीधरला स्प्रे घेण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम जमा होणार का? या प्रश्नांची उत्तरं छोटी मालकीण ही मालिका पाहिल्यावरच प्रेक्षकांना मिळणार आहे.
छोटी मालकीण ही मालिका सुरू झाल्यापासून या मालिकेची कथा, व्यक्तिरेखा प्रेक्षकांना चांगल्याच आवडत आहेत. या मालिकेत अक्षर कोठारी प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत दिसत आहे तर एतशा संझगिरी या मालिकेत छोटी मालकीण ही भूमिका साकारत आहे. या दोघांच्याही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. त्याचसोबत या मालिकेचे शीर्षक गीत देखील लोकांनी खूपच आवडत आहे. रेवती आणि श्रीधर यांच्यातल्या अनोख्या नात्याचे चित्रण असलेल्या 'छोटी मालकीण' या स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेच्या शीर्षक गीतामध्ये आदर्श शिंदेचा सुरेल आवाज, मनात रेंगाळणारी चाल आणि लोकगीताशी नाते सांगणारे शब्द असा उत्तम योग्य जुळून आला आहे. त्यामुळेच 'छोटी मालकीण'चे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले आहे.
Also Read : स्टार प्रवाहच्या 'छोटी मालकीण' मध्ये दादूस अर्थात संतोष चौधरीचा धमाकेदार परफॉर्मन्स