कलीरेंमध्ये आशा नेगी आणि रित्विक धनजानी होणार मीरा आणि सुमेरच्या लग्नात सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 12:10 IST2018-03-31T06:39:54+5:302018-03-31T12:10:43+5:30

झी टीव्हीवर दर सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित होणारा आणि नुकताच सुरू झालेला शो कलीरेंने आपल्या जबरदस्त ...

Participants in the marriage of Asha Negi and Ritik Dhanani will participate in the marriage of Meera and Sumer | कलीरेंमध्ये आशा नेगी आणि रित्विक धनजानी होणार मीरा आणि सुमेरच्या लग्नात सहभागी

कलीरेंमध्ये आशा नेगी आणि रित्विक धनजानी होणार मीरा आणि सुमेरच्या लग्नात सहभागी

टीव्हीवर दर सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित होणारा आणि नुकताच सुरू झालेला शो कलीरेंने आपल्या जबरदस्त नाट्‌यमय वळणांसह प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. सध्या ह्या शोमध्ये प्रमुख पात्रे मीरा (अदिती शर्मा) आणि सुमेर (परमवीर सिंग चीमा) यांचे लग्न होणार असून यात प्रेक्षकांना मीराच्या संगीत सोहळ्‌यामध्ये खास स्टार्सचे प्रदर्शन आणि त्यानंतर
मीराला हिप्नॉटाईज करून पळवून नेण्याचीही योजना आखण्यात येणार आहे. मीरा आणि सुमेर यांच्या लग्नाच्या ह्या संगीत सोहळ्‌यामध्ये टेलिव्हिजनवरील देखणे जोडपे आशा नेगी आणि रित्विक धनजानीसुद्धा दिसून येणार आहेत. ह्या सोहळ्‌यामध्ये त्यांची ओळख मीराचे दोस्त अशी करण्यात येणार असून ते मीराच्या परिवारासोबत लग्नाच्या सर्व सोहळ्‌यांमध्ये सहभागी होतील. एवढेच नाही तर ते सलमान खानचे सुपरहिट गाणे स्वॅग से स्वागतवरही थिरकताना दिसून येतील. आपल्या ह्या भूमिकेबद्दल रित्विक म्हणाला, “ह्या इंडस्ट्रीमध्ये एक जोडी म्हणून आमचा प्रवास ह्याच वाहिनीसोबत सुरू झाला. त्यामुळे ह्या वाहिनीवर परत येताना छान आम्हांला खूप छान वाटतंय. मी कलीरेंबद्दल काही छान गोष्टी ऐकल्या आहेत. ह्या महाएपिसोडमध्ये काम करताना
मस्त वाटतंय. हा एक रोमांचक भाग असून आमचा परफ़ॉर्मन्स अगदी ह्या नाट्‌यमय वळणांमध्ये आहे.”

लग्नापूर्वी आपल्या सवयींमध्ये बदल घडवून आणण्याच्या प्रथेविरोधात आवाज उठविण्यात आला आहे.पंजाबमधील एका खेड्यात राहणाऱ्या मीरा नावाच्या मुलीची ही कथा आहे.उत्तम पती मिळावा,यासाठी काही कौशल्ये शिकविणाऱ्या आणि आपल्या सवयींमध्ये बदल घडविणाऱ्या प्रशिक्षण संस्थांचे पंजाबमध्ये सध्या पेव फुटले आहे. लग्नापूर्वी स्वत:त मुद्दाम बदल घडविण्याच्या या प्रथेला मीराचा विरोध असतो.या मालिकेत मीराची भूमिका आदिती शर्मा ही नवोदित अभिनेत्री साकारीत असून टीव्हीवरील बांधेसूद देहयष्टीचा देखणा अभिनेता अर्जित तनेजा हा नायक विवान कपूरची भूमिका रंगविणार आहे.

Web Title: Participants in the marriage of Asha Negi and Ritik Dhanani will participate in the marriage of Meera and Sumer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.