​भालचंद्र नेमाडेंच्या ‘कोसला’ कादंबरीचे नाटकात रुपांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2016 17:24 IST2016-03-26T00:24:16+5:302016-03-25T17:24:16+5:30

ज्ञानपीठ प्राप्त लेखक भालचंद्र नेमाडे लिखित ‘कोसला’ चे नाटकात रूपांतर करण्याचा भार सारा क्रिएशनने हाती घेतला आहे. १९६३ मध्ये ...

Parineetals of Bhalchandra Nemaden's Kosala novel adaptation | ​भालचंद्र नेमाडेंच्या ‘कोसला’ कादंबरीचे नाटकात रुपांतर

​भालचंद्र नेमाडेंच्या ‘कोसला’ कादंबरीचे नाटकात रुपांतर


/>ज्ञानपीठ प्राप्त लेखक भालचंद्र नेमाडे लिखित ‘कोसला’ चे नाटकात रूपांतर करण्याचा भार सारा क्रिएशनने हाती घेतला आहे. १९६३ मध्ये ‘कोसला’मधील पांडुरंग सांगवीकर रसिकांच्या भेटीला आला होता. आता पांडुरंग सांगवीकर आपल्याला ‘मी पांडुरंग सांगवीकर’ या नाटक रुपात भेटायला येणार आहे. नेमाडेंच्या ‘देखणी’ या काव्यसंग्रहातील कविता आणि ‘कोसला’ या कादंबरीतील उतारे हे एकत्र करून दीड तासाचा पहिला प्रयोग पुण्यात सादर करण्यात आला. 

मंदार देशपांडे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. कादंबरीच नाटकात बदल करताना काही बदल केला नाही. पांडुरंंगाची व्यक्तिरेखा पद्मनाभ बिंड यांनी साकारली आहे. आशिष नरखेडकर, पूर्णानंद वांढेकर, आनंद प्रभू, विक्रांत बदरखे, कल्याण पाटील यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

Web Title: Parineetals of Bhalchandra Nemaden's Kosala novel adaptation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.