'पटियाला बेब्ज'मध्ये परिधि शर्मा करणार नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 19:30 IST2019-02-19T19:30:00+5:302019-02-19T19:30:00+5:30
'पटियाला बेब्ज'मध्ये सध्या बबिता धाडस करत जगात आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आयुष्य जगण्याची सुरुवात करण्याचा प्रयत्न करत आहे.

'पटियाला बेब्ज'मध्ये परिधि शर्मा करणार नोकरी
सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजन वाहिनीवरील मालिका 'पटियाला बेब्ज'मध्ये सध्या बबिता धाडस करत जगात आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आयुष्य जगण्याची सुरुवात करण्याचा प्रयत्न करत आहे. हा ह्या गोष्टीचा टर्निंग पॉईंट आहे ज्यामध्ये बबिता एका सालस आणि भाबड्या सुनेच्या रूपातून बाहेर पडून तिच्या आणि मुलीच्या चांगल्या आयुष्यासाठी प्रयत्न करणार आहे.
'पटियाला बेब्ज' मालिकाच्या भागांमध्ये बबिता आपल्या पहिल्या नोकरीचा इंटरव्ह्यू देताना दिसेल आणि ती उघडपणे नर्व्हस दिसते आहे आणि त्याचा जो काही निकाल लागेल त्यामुळे प्रेक्षकांचे तर मनोरंजन नक्कीच होणार आहे. बबिताची भूमिका करणारी परिधी शर्मा खऱ्या आयुष्यात एमबीए झाली आहे.
त्याविषयी विस्तृतपणे बोलताना ती म्हणाली, माझे एमबीए झाल्यानंतर मी कॅंपस प्लेसमेंटमार्फत दोन इंटरव्ह्यू दिले होते. मला खरोखरंच एक नियमित नोकरी करायची होती पण लवकरच मला समजले की हे माझे क्षेत्र नाही. पण तरीही मी काही इंटरव्ह्यूला गेले. मला
खूप आत्मविश्वास वाटत होता आणि रेझ्युमे तयार करणे हा माझ्या अभ्यासाचाच एक भाग होता आणि ती माझ्यासाठी अगदी साधी गोष्ट होती. पण बबितासाठी मात्र ती खूप मोठी गोष्ट आहे कारण ती नेहमीच एका गृहिणीच्या भूमिकेत वावरली आहे आणि त्यासाठी मिनी तिला मदत करते. बबिता भित्री, सालस आणि खूपच नर्व्हस आहे.
सगळ्या अडथळ्यांवर मत करत बबिता स्वतःसाठी नोकरी कशाप्रकारे शोधते हे जाणून घेण्यासाठी 'पटियाला बेब्ज' दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता फक्त सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर पहायला मिळेल.