काला टीका या मालिकेच्या यशासाठी पराग त्यागी, करणवीर बोहरा आणि एकता कपूरने घेतले सिद्धीविनायकाचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2017 10:34 IST2017-02-25T05:03:51+5:302017-02-25T10:34:48+5:30

काला टीका या मालिकेत सध्या पराग त्यागी ठाकूर ही भूमिका साकारत आहे. हा ठाकूर खलनायक असल्याचे आपल्याला पाहायला मिळत ...

Parag Tyagi, Karanveer Bohra and Ekta Kapoor took the siddhi Vinayaka for the success of the series | काला टीका या मालिकेच्या यशासाठी पराग त्यागी, करणवीर बोहरा आणि एकता कपूरने घेतले सिद्धीविनायकाचे दर्शन

काला टीका या मालिकेच्या यशासाठी पराग त्यागी, करणवीर बोहरा आणि एकता कपूरने घेतले सिद्धीविनायकाचे दर्शन

ला टीका या मालिकेत सध्या पराग त्यागी ठाकूर ही भूमिका साकारत आहे. हा ठाकूर खलनायक असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. याआधी परागने ब्रम्हराक्षस या मालिकेत ब्रम्हराक्षस ही प्रमुख भूमिका साकारली होती आणि ही भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. आता काला टीका या मालिकेतील खलनायक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावा यासाठी तो खूप मेहनत घेत आहे. ब्रम्हराक्षस या मालिकेतील त्याच्या भूमिकेपेक्षा ठाकूर ही भूमिका पूर्णपणे वेगळी असल्याने या भूमिकेसाठी तो बारीक सारीक गोष्टीदेखील मालिकेच्या टीमकडून समजून घेत आहे. या मालिकेच्या यशासाठी त्याने नुकतेच सिद्धीविनायकाला जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी या मालिकेची निर्माती एकता कपूर आणि कबूल है या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा करणवीर बोहरादेखील त्याच्यासोबत होता. 
एकता कपूर अनेकवेळा सकाळच्या वेळात सिद्धीविनायकाला चालत जात असल्याचे आपण ऐकले आहे. यावेळी पराग आणि करणने तिला साथ दिली. ते तिघे 14 किलोमीटर चालत गेले. याविषयी पराग सांगतो, "माझा देवावर खूप विश्वास आहे. एकता माझी खूप चांगली मैत्रीण आहे. ती दुसऱ्या दिवशी सिद्धीविनायकाला चालत जाणार असल्याचे तिने आदल्या दिवशी मला मेसेज करून सांगितले आणि मी देखील तिच्यासोबत जाण्यासाठी तयार झालो. आम्ही पाच वाजता चालायला सुरुवात केली. आम्हाला 14 किमी चालायला जवळजवळ पाच तास लागले. आम्ही 19900 पावले चाललो. रस्त्यावरून जाताना आम्हाला आणखी 14 मंदिरे दिसली. त्या देवळांमध्येही जाऊनदेखील आम्ही दर्शन घेतले. तो अनुभव खरेच खूप छान होता." 

Web Title: Parag Tyagi, Karanveer Bohra and Ekta Kapoor took the siddhi Vinayaka for the success of the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.