शेफालीचा मृत्यू अँटी एजिंग इंजेक्शनमुळे? अखेर पती परागने सत्य सांगूनच टाकलं! म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 11:57 IST2025-09-23T11:52:36+5:302025-09-23T11:57:18+5:30
रिकाम्या पोटी घेतलेले अँटी एजिंग इजेक्शन ठरले मृत्यूचं कारण? शेफाली जरीवालाच्या निधनाबद्दल पती पराग म्हणाला...

शेफालीचा मृत्यू अँटी एजिंग इंजेक्शनमुळे? अखेर पती परागने सत्य सांगूनच टाकलं! म्हणाला...
Parag Tyagi Reaction: 'बिग बॉस-१३' फेम 'कांटा लगा' गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री शेफाली जरीवालाचं काही महिन्यांपूर्वीच आकस्मिक निधन झालं. वयाच्या ४२ व्या वर्षी अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला. तिच्या जाण्याने अनेकांना धक्काच बसला आहे.शेफालीच्या निधनानंतर तिचे कौटुंबिय अजूनही त्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. दरम्यान, अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर अनेक बातम्या समोर आल्या होत्या.शेफालीने अॅंटी एजिंग इंजेक्शन तिच्या मृत्यूचं कारण ठरलं, शिवाय तिने उपवासही धरला होता असे अनेक तर्कवितर्क लावण्यात आले.या अफवांवर आता अभिनेत्रीचा पती पराग त्यागीने पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.
अलिकडेच पराग त्यागीने एक नवीन युट्यूब चॅनेल सुरु केलं आहे. शेफाली पराग त्यागी असं या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. नुकताच त्यावर परागने एक पॉडकास्ट शेअर केला.दरम्यान, या पॉडकास्टमध्ये त्याने शेफाली जरीवालाच्या निधनाच्या रात्री काय घडलं होतं. त्याचबरोबर शेफालीने अॅंटी एजिंग इंजेक्शन घेतलं होतं का त्या अफवांवरही भाष्य केलं. त्याविषयी बोलताना पराग त्यागी म्हणाला, "ही सगळी अर्धवट माहिती आहे. मला देखील हाच प्रश्न पडलाय ती कोणती अॅंटी एजिंग औषधे घेत नव्हती. शेफाली रोज मल्टिव्हिटॅमिन्सच्या गोळ्या घेऊ शकत नव्हती कारण ती विसरायची. त्यामुळे महिन्यातून एकदा ती आयव्ही ड्रॉप घेत होती. "
त्यानंतर पराग म्हणाला, "शेफालीचा उपवास होता पण तिने पूजा झाल्यानंतर ती जेवून झोपली होती. शिवाय असंही नव्हतं की तिने पूर्ण दिवस काहीच खाल्ल नव्हतं.
शेफाली जरीवाला एक बॅलेन्स डायट करायची. तिला रविवार असला की आईसक्रिम आणि चायनिज देखील खायला आवडायचं. पण ती कायम डायटकडे लक्ष द्यायची", असा खुलासा परागने केला.
परागने 'त्या' अफवांना दिला पूर्णविराम
यानंतर पराग त्यागी चाहत्यांना विनंती करत म्हणाला, "मला माहित नाही की ही उपवासाची अफवा कोणी पसरवली. लोकांनी काही माहिती नसतानाही ते बोलत असतात. यापुढे माझी सगळ्यांनी हीच विनंती असेल की कृपया अशी चुकीची माहिची पसरवणं बंद करा." अशा भावना देखील अभिनेत्याने व्यक्त केल्या.