जीव धोक्यात घालून केलं शूटिंग, वर्षभरापासून मिळाले नाहीत पैसे, 'हा' अभिनेता झाला कर्जबाजारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 16:27 IST2024-07-20T16:24:30+5:302024-07-20T16:27:08+5:30

अभिनेता मोठ्या कर्जात बुडाल्याने खूप चिंतेत आहे. कर्जामुळे रात्री झोपही येत नाही. त्याने अनेक टीव्ही शोमध्ये काम केलं आहे.

Pankaj Bhatia did not get payment from show he is facing financial crisis | जीव धोक्यात घालून केलं शूटिंग, वर्षभरापासून मिळाले नाहीत पैसे, 'हा' अभिनेता झाला कर्जबाजारी

जीव धोक्यात घालून केलं शूटिंग, वर्षभरापासून मिळाले नाहीत पैसे, 'हा' अभिनेता झाला कर्जबाजारी

अभिनेता पंकज भाटिया हा टीव्हीवरचा प्रसिद्ध चेहरा आहे. त्याने अनेक टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. पण आता अभिनेता मोठ्या कर्जात बुडाल्याने खूप चिंतेत आहे. कर्जामुळे पंकजला रात्री झोपही येत नाही. 'ये है मोहब्बतें'मध्ये तो दिसला होता. कोरोनाच्या दिवसांमध्ये तो ज्या शोशी संबंधित होता तिथे आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला आणि आर्थिक अडचणींमुळे तो शो बंद झाला. यामुळे त्याला जवळपास वर्षभर पैसे मिळालेले नाहीत असं पंकजने म्हटलं आहे. 

पंकजने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून आपली व्यथा मांडली होती. आता अभिनेत्याने टेली टॉकशी संवाद साधताना त्याच्या समस्येबद्दल पुन्हा एकदा सांगितलं. तो म्हणाला, "कोविड 19 दरम्यान मी एका शोशी जोडलो होतो. निर्माते आर्थिक संकटात सापडले होते. एका चित्रपटात त्यांनी पैसे गुंतवले होते, पण त्यात त्यांचे नुकसान झाले. यानंतर मी करत असलेला शोही याच कारणामुळे बंद झाला. आता शो बंद होऊन एक वर्ष झाले आहे, पण मला अद्याप फी मिळालेली नाही."

नातेवाईकांकडे पैसे मागण्याची आली वेळ

"आता अशी वेळ आली आहे की नातेवाईकांकडून पैसे मागून काम कराव लागत आहे. माझं कर्ज वाढत आहे. जर मला पैसे मिळाले तर त्यातील ७० टक्के रक्कम कर्जाची परतफेड करण्यासाठी जाईल. मी निर्मात्यांना माझे पैसे देण्याचे आवाहन करतो. प्रत्येक वेळी फक्त पैसे देण्याची तारीख दिली जाते. परंतु त्या तारखेला पैसे कधीच मिळाले नाहीत. माझी फी एवढीही नाही की ती देणं कठीण होत आहे. मी ५० हजार रुपयेवाला अभिनेता नाही."

जीव धोक्यात घालून केलं शूटिंग

पंकजने पुढे सांगितले की, ज्या ठिकाणी शूटिंगसाठी जायचा ते ठिकाण घरापासून खूप दूर होतं. हजारो रुपये खर्च करून दररोज ये-जा करणं कठीण झालं होतं. मग मी बाईक घेतली आणि अनेक वेळा अपघात होता होता वाचला आहे. म्हणजे मी जीव धोक्यात घालून शूटिंगला जायचो. पैसे न मिळाल्यास सिंटाकडे तक्रार करणार असल्याचं अभिनेत्याने म्हटलं आहे.
 

Web Title: Pankaj Bhatia did not get payment from show he is facing financial crisis