अरे देवा ह्या काय....? पांडू, काशी अन् हापूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 12:06 IST2019-04-22T12:05:47+5:302019-04-22T12:06:25+5:30

झी मराठी वाहिनीवरील 'रात्रीस खेळ चाले' मालिकेच्या प्रीक्वेलला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असून या पर्वाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचवली आहे

Pandu and Kashi's Mango Parties on Ratris Khel Chale 2 Sets | अरे देवा ह्या काय....? पांडू, काशी अन् हापूस

अरे देवा ह्या काय....? पांडू, काशी अन् हापूस

झी मराठी वाहिनीवरील 'रात्रीस खेळ चाले' मालिकेच्या प्रीक्वेलला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असून या पर्वाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचवली आहे. या मालिकेच्या पुढच्या भागात नेमके होणार तरी काय याचे कुतूहल अनेकांमध्ये पाहायला मिळते आहे. याचे श्रेय हे मालिकेतील कलाकारांनाही जाते. मुख्य म्हणजे 'रात्रीस खेळ चाले २', मधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची दाद मिळते आहे. 

'रात्रीस खेळ चाले २' मालिकेतील पांडू व काशी या दोन पात्रांनी रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या पात्रांची नावे घेताच समोर उभा राहतो तो 'इसरलंय....' म्हणणारा 'पांडू' आणि 'गोळीयो घालीन....' असं वारंवार म्हणत अण्णा नाईक असल्याचे भासवणारा काशी. हे दोघेही सध्या मालिकेच्या चित्रीकरणासोबत हापूस आंब्याचा आस्वाद घेत आहेत.

कडकडीत उन्हाळ्यात आपण सगळे आंबे खाण्यासाठी उत्सुक असतो आणि रात्रीस खेळ चाले या मालिकेचे शूटिंग देखील मालवणात होत असल्यामुळे सेटवर आंबा पार्टी तर बनते. हापूस आंब्याचा आस्वाद घेताना टिपलेला पांडू आणि काशीचा हा खास फोटो त्यांच्या चाहत्यांसाठी. यांची आम पार्टी तुम्हाला कशी वाटली?

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या पहिल्या भागालाही रसिकांनी डोक्यावर घेतले होते. आता प्रीक्वेलमध्ये अण्णाच्या आयुष्यातील घटना दाखवल्या जात आहेत.

नाईकांच्या वाड्यातील रहस्यांचे मुळ या भागात दडलेले असल्याची शंका नाकारता येत नाही. आता या मालिकेत शेवंताचा शिरकाव झाला आहे. शेवंता ही सुशल्याची आई आहे. शेवंता आणि आण्णाच्या नातेसंबंधामुळे नाईकांच्या वाड्यातील वातावरणही क्लेषित झाले आहे.
 

Web Title: Pandu and Kashi's Mango Parties on Ratris Khel Chale 2 Sets