​पम्मी आंटी बिग बॉसमध्ये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2016 11:24 IST2016-09-30T05:54:43+5:302016-09-30T11:24:43+5:30

सुमीर पसरीचा साकारत असलेली पम्मी आंटी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. पम्मा आंटी देशातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. पम्मी आंटी ...

Pammy Aunt Big Boss? | ​पम्मी आंटी बिग बॉसमध्ये?

​पम्मी आंटी बिग बॉसमध्ये?

मीर पसरीचा साकारत असलेली पम्मी आंटी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. पम्मा आंटी देशातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. पम्मी आंटी या व्यक्तिरेखेच्या लोकप्रियतेमुळे सुमीरला बिग बॉससाठी विचारण्यात आले असल्याची चर्चा आहे. सुमीर पम्मी आंटी म्हणून फेमस तर आहेच. पण त्याचसोबत ससुराल सिमर का या मालिकेतही त्याने काम केले आहे. बिग बॉस 10मध्ये सेलिब्रेटींसोबत सामान्य लोकही हजेरी लावणार आहेत. या सिझनमधील सगळेच सेलिब्रेटी नामवंत असावेत यासाठी चांगल्या सेलिब्रेटींचा सध्या शोध सुरू आहे. सुमीरला बिग बॉसबद्दल विचारण्यात आले की नाही या बातमीला त्याने अद्याप दुजोरा दिलेला नाही. पण सुमीर बिग बॉसच्या घरात आला तर प्रेक्षकांना पम्मी आंटीचे लटकेझटके बिग बॉसच्या घरातही पाहायला मिळतील यात काहीच शंका नाही.

Web Title: Pammy Aunt Big Boss?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.