पल्लवी सुभाषचा अशोकामधला प्रवास संपला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2016 11:45 IST2016-09-03T06:15:30+5:302016-09-03T11:45:30+5:30
प्रसिद्ध मालिका चक्रवर्ती अशोक सम्राटमध्ये अभिनेत्री पल्लवी सुभाष हिचा प्रवास संपलाय. या मालिकेत पल्लवीनं धर्मा ही भूमिका साकारते. या ...

पल्लवी सुभाषचा अशोकामधला प्रवास संपला
प रसिद्ध मालिका चक्रवर्ती अशोक सम्राटमध्ये अभिनेत्री पल्लवी सुभाष हिचा प्रवास संपलाय. या मालिकेत पल्लवीनं धर्मा ही भूमिका साकारते. या मालिकेत धर्माचा सियामक (अभिराम नैन) याच्याशी आमना सामना होता. धर्मा त्याला आपली चूक मान्य करायला भाग पाडते. त्याचवेळी पाठीमागून सुशिम (अंकित अरोरा) धर्माला गुदमरुन मारतो. हाच सीन पल्लवीचा या मालिकेतील क्लायमेक्सचा सीन असणार आहे. यानंतर मालिका नवा ट्विस्ट घेणार असून अशोकाचा उदय होणार आहे. आपल्या आईच्या मृत्यूचा बदला घेणा-या अशोकाचं नवं रुप मालिकेत पाहायला मिळेल. मात्र मालिकेच्या या पुढील प्रवासात पल्लवी सुभाष असणार नाही. तिच्या क्लायमेक्सच्या भागाचं चित्रीकरण सुरु असून लवकरच हा भाग रसिकांच्या भेटीला येईल.