बिकनीतले फोटो शेअर करत पल्लवी पाटीलनं स्वतःला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 14:51 IST2023-10-23T14:51:23+5:302023-10-23T14:51:39+5:30
Pallavi Patil : अभिनेत्री पल्लवी पाटील तिच्या बोल्ड लूकमुळेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. मालिकेत अतिशय साध्या अंदाजात आपण पाहिलेली पल्लवी मात्र रिअल लाईफमध्ये खूपच स्टायलिश आणि बोल्ड आहे. आज ती तिचा ३४ वा वाढदिवस साजरा करते आहे.

बिकनीतले फोटो शेअर करत पल्लवी पाटीलनं स्वतःला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे पल्लवी पाटील (Pallavi Patil). पल्लवी प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. तसेच ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान आज पल्लवी पाटीलचा वाढदिवस असून तिने स्वतःला शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री पल्लवी पाटील तिच्या बोल्ड लूकमुळेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. मालिकेत अतिशय साध्या अंदाजात आपण पाहिलेली पल्लवी मात्र रिअल लाईफमध्ये खूपच स्टायलिश आणि बोल्ड आहे. सोशल मीडियावर तिचे एकसे बढकर एक फोटो शेअर करत चाहत्यांच्याही वाहवा मिळवताना दिसते. आज तिने वाढदिवसा दिवशी देखील बिकनीतील फोटो शेअर करत स्वतःला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने लिहिले की, ३४ इट इज!!! हॅप्पी बर्थडे टू मी. पल्लवीच्या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
वर्कफ्रंटबद्दल...
पल्लवी पाटीलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिला रुंजी या मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली.आजही पल्लवी पाटील 'रुंजी' मालिकेमुळेच जास्त चाहत्यांच्या लक्षात आहे. याशिवाय तिने बापमाणूस, रुंजी, अग्निहोत्र 2, वैदही अशा मालिकांमधून आपला ठसा उमटवला आहे. तसेच ती जर तरची गोष्ट या नाटकात काम करताना दिसते आहे. या नाटकात पल्लवी शिवाय आशुतोष गोखले, उमेश कामत, प्रिया बापट हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.