पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने दिला पती असद खटकला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2017 18:51 IST2017-03-16T13:19:10+5:302017-03-16T18:51:08+5:30

वादग्रस्त मॉडेल आणि पाकिस्तानी अभिनेत्रीने नुकताच एक खुलासा केला आहे.तिने चार वर्षापूर्वी असद बशीर खान खटकस लग्न केले होते. ...

Pakistani actress Veena Malik gave divorce to husband Asad Khatk | पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने दिला पती असद खटकला घटस्फोट

पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने दिला पती असद खटकला घटस्फोट

दग्रस्त मॉडेल आणि पाकिस्तानी अभिनेत्रीने नुकताच एक खुलासा केला आहे.तिने चार वर्षापूर्वी असद बशीर खान खटकस लग्न केले होते. मात्र आता कौटुंबिक कलहामुळे वीणाने असहपासून गेल्याच महिन्यात घटस्फोट घेतला असल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे. वीणाने डिसेंबर 2013 मध्ये दुबईस्थित बिझनेसमन असद खटकसोबत लग्न केले होते. 23 सप्टेंबर 2014 रोजी वीणाने मुलाला जन्म दिला होता. खुद्द वीणाचा पती असद बशीर खान खटक याने या बाळाचा फोटो ट्विटरवर पोस्ट करत ही गोड बातमी  दिली होती. त्यानंतर वर्षभराने अर्थातच 23 सप्टेंबर 2015 रोजी मुलगी अमालचा जन्म झाला.असद तोडगा काढून लग्न टिकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले जात आहे. पण वीणाने पुन्हा असदसोबत जुळवून घेण्यासाठी स्पष्ट नकार दिला.असदच्या पैशांमुळेच वीणाने त्याच्यासह लग्न केले होते, आता असदची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे तिने त्याला घटस्फोट दिल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.मात्र या काणामुळे असदला घटस्फोट दिला नसून असद नेहमी मारहाण करण्यासोबतच फिजिकली-मेंटली एब्यूज करायचा याला कंटाळून घटस्फोट घेतल्याचे वीणाने म्हटले आहे.बॉलिवूडमध्ये वीणाने 'जिंदगी 50-50' आणि 'मुंबई 125 KM' या सिनेमांमध्ये काम केले. ती सर्वाधिक चर्चेत 'बिग बॉस 4' या शोमुळे आली होती. शोमध्ये वीणाला अश्मित पटेलसोबत इंटीमेट होताना बघितले गेले होते.

Web Title: Pakistani actress Veena Malik gave divorce to husband Asad Khatk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.