दुखापत होऊनही क्रांती प्रकाश झाने केले चित्रिकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 13:10 IST2018-03-31T07:40:55+5:302018-03-31T13:10:55+5:30
अभिनेता क्रांती प्रकाश झा सध्या डिस्कव्हरी जीत वाहिनीवरील मालिका स्वामी रामदेवः एक संघर्षमध्ये प्रमुख भूमिका साकारत असून ही व्यक्तिरेखा ...

दुखापत होऊनही क्रांती प्रकाश झाने केले चित्रिकरण
अ िनेता क्रांती प्रकाश झा सध्या डिस्कव्हरी जीत वाहिनीवरील मालिका स्वामी रामदेवः एक संघर्षमध्ये प्रमुख भूमिका साकारत असून ही व्यक्तिरेखा साकारताना ते कुठलीही कसर बाकी सोडत नाहीयेत. वास्तव जीवनातील हीरोची व्यक्तिरेखा साकारणारा क्रांती हा सुद्धा एक हीरोच आहेत. क्रांती नुकतेच नदीमध्ये एक जबरदस्त दृश्य साकारत होते आणि त्याचवेळी एका गंभीर दुखापतीचा त्याला सामना करावा लागला.दुखापत होऊनही कुठेही न थांबता त्याने धैर्याने त्या भागाचे चित्रिकरण पूर्ण केले.
क्रांती प्रकाश झा म्हणाला, “मला नदीत उडी मारायची होती आणि एकदा का कॅमेरा माझ्या डोक्यावर आला की बाहेर यायचे होते. उडी मारली तेव्हाच खरचटले आणि त्या चिखल असलेल्या पाण्यात मला अजिबात उभे राहावत नव्हते.मी पाण्यात असल्यामुळे मला बाहेरच काही ऐकूही येत नव्हते. नदीच्या आत उभे राहणे खूपच कठीण वाटत होते.त्यात मला पोहायता येत नाही.”त्याचवेळी वॉटरगेट प्रॉडक्शन्सच्या क्रू ला आतमध्ये काहीतरी गडबड असल्याचे जाणवले आणि त्यांनी मला अगदी योग्य क्षणी बाहेर काढले. मला त्यांनी तात्काळ प्रथमोपचार दिले.प्रॉडक्शन हाऊसने चित्रीकरण एक दिवसासाठी पुढे ढकलण्याचेही सुचवले.पण ते आऊटडोअर शूट असल्यामुळे मी चित्रीकरण सुरूच ठेवण्याचा आग्रहच धरला आणि त्या भागाचे शूटिंग पूर्ण केले. पण तरीही त्या घटनेमुळे मला झालेली दुखापत पूर्णपणे बरी होण्यासाठी जवळजवळ एक आठवडा लागला.”
स्वामी रामदेवः एक संघर्ष ही एक बायोपिक सीरीज असून यात स्वामी रामदेव यांच्या आजतागायत कधीही न पाहिलेल्या अज्ञातवासातील एका व्यक्तीपासून नावाजलेले योग गुरू,व्यवसाय नेता आणि राष्ट्रीय आयकॉन बनण्यापर्यंतचा प्रवास रेखाटण्यात आला आहे. वॉटरगेट प्रॉडक्शन्स निर्मित ह्या शोमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेता नमन जैन रामकिशन (तरूण रामदेव) आणि क्रांती प्रकाश झा हे स्वामी रामदेव यांच्या भूमिकेत झळकणार आहे.