'पारू' मालिकेला अचानक लागला ब्रेक, का बंद करावी लागली सिरीयल? समोर आलं मोठं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 15:49 IST2026-02-15T15:48:58+5:302026-02-15T15:49:33+5:30
अचानक 'पारू' मालिकेचं प्रक्षेपण झी मराठीवरुन बंद करण्यात आलं आहे. चांगला टीआरपी मिळत असूनही अचानक मालिका बंद होणार आहे. यामागचं मोठं कारण समोर आलं आहे.

'पारू' मालिकेला अचानक लागला ब्रेक, का बंद करावी लागली सिरीयल? समोर आलं मोठं कारण
झी मराठी वाहिनीवरील 'पारू' ही प्रेक्षकांची अतिशय लाडकी मालिका आहे. या मालिकेने सुरु झाल्यानंतर अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली होती. पारू आणि आदित्यची जोडी प्रेक्षकांना भावली होती. तर अहिल्यादेवी ही भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. पण, अचानक 'पारू' मालिकेचं प्रक्षेपण झी मराठीवरुन बंद करण्यात आलं आहे. चांगला टीआरपी मिळत असूनही अचानक मालिका बंद होणार आहे. यामागचं मोठं कारण समोर आलं आहे.
१० नोव्हेंबर नंतर 'पारू' मालिकेचा एकही भाग टेलिकास्ट झालेला नाही. त्यामुळे प्रेक्षकही संभ्रमात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 'पारू' मालिकेतील कलाकारांना जवळपास ३-४ महिने मानधन मिळालेलं नाही. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून कलाकारांटे मानधन थकवले गेले आहे. निर्मात्यांनी कोणतीही ठोस पावलं न उचलल्याने ही मालिका अचानक बंद करण्याचा निर्णय घेणात आला आहे. अपरिहार्य कारणांमुळे आणि आव्हानांमुळे ही मालिका काही काळ विश्रांती घेत आहे. पण लवकरच निरोपाचा शेवटचा आठवडा प्रसारित केला जाईल आणि याची वेळ लवकरच कळवली जाईल, असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
'पारू' मालिकेने जवळपास दोन वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन केलं. या मालिकेत शरयू सोनावणे आणि प्रसाद जवादे मुख्य भूमिकेत होते. तर मुग्धा कर्णिकने अहिल्यादेवी हे पात्र साकारले होते. पूर्वा शिंदेने साकारलेली खलनायिकेची भूमिकाही प्रेक्षकांना आवडली होती. मात्र मालिका बंद झाल्याने चाहते नाराज झाले आहेत.