अभिनेता प्रसाद जवादेवर कोसळला दु:खाचा डोंगर! दीर्घ आजारामुळे आईचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 08:45 IST2025-12-29T08:42:50+5:302025-12-29T08:45:12+5:30
अभिनेता प्रसाद जवादेला मातृशोक! दीर्घ आजारामुळे आईचं निधन

अभिनेता प्रसाद जवादेवर कोसळला दु:खाचा डोंगर! दीर्घ आजारामुळे आईचं निधन
Prasad Jawade Mother Passes Away: आजचा दिवस उजाडला तो एका दु: खद बातमीने. मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता प्रसाद जवाहेला मातृशोक झाला आहे. प्रसादच्या आई प्रज्ञा जवादे यांचं काल २८ डिसेंबर रोजी निधन झालं आहे. प्रसादाची आई गेला काही काळ कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होत्या. मात्र, त्यांचा हा लढा अपयशी ठरला. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या आईच्या निधनानंतर मराठी कलाविश्वातून दु:ख व्यक्त केलं जात आहे.

दरम्यान, याबाबत अभिनेत्याची पत्नी अमृता देशमुखने सोशल मीडियावर माहिती दिली आहे. अमृताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरी शेअर करत म्हटलंय, "सौ प्रज्ञा जवादे ( प्रसाद जवादेची आई) 15 सप्टेंबर 1960 - 28 डिसेंबर 2025, वय 65 वर्षे... कळवण्यास अत्यंत दुःख होत आहे की, आज, 28 डिसेंबर 2025 रोजी त्यांचे दुःखद निधन झाले आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी त्यांनी अपार धैर्य, आणि सकारात्मकतेने लढा दिला. त्या प्रेमळ, शांत आणि कुटुंबाला एकत्र ठेवणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या होत्या. त्यांची आठवण सदैव आमच्या हृदयात राहील. या पोस्टच्या खाली तिने आम्हाला तुमची खूप आठवण येईल मम्मी...", अशी पोस्ट अभिनेत्रीने लिहिली आहे. अमृताची ही पोस्ट पाहून चाहतेही हळहळले आहेत.
प्रसाद आणि त्याच्या आईचं नातं फार खास होतं. अनेकदा तो त्याच्या आईबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसायचा. त्याच्या या संपूर्ण प्रवासात आईने त्याला खूप सपोर्ट केला होता.आईच्या निधनानंतर प्रसादसह त्याच्या संपूर्ण कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, प्रसाद जवादे हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या तो झी मराठी वाहिनीवरील पारू मालिकेत मुख्य भूमिका साकारतो आहे.