"तुझी खूप आठवण येतेय...", आईच्या निधनानंतर प्रसाद जवादेने शेअर केली भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 11:12 IST2026-01-09T11:11:44+5:302026-01-09T11:12:13+5:30
आईच्या निधनामुळे प्रसादवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. प्रसादची पत्नी आणि अभिनेत्री अमृता देशमुख हिने सासूबाईंच्या निधनाची बातमी चाहत्यांना दिली होती. आता आईच्या निधनानंतर प्रसादने भावुक पोस्ट शेअर केली आहे.

"तुझी खूप आठवण येतेय...", आईच्या निधनानंतर प्रसाद जवादेने शेअर केली भावुक पोस्ट
मराठी अभिनेता प्रसाद जवादे याच्या आईचं २८ डिसेंबर २०२५ रोजी निधन झालं. ६५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेली काही वर्ष कर्करोगाशी झुंज देत होत्या. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. आईच्या निधनामुळे प्रसादवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. प्रसादची पत्नी आणि अभिनेत्री अमृता देशमुख हिने सासूबाईंच्या निधनाची बातमी चाहत्यांना दिली होती. आता आईच्या निधनानंतर प्रसादने भावुक पोस्ट शेअर केली आहे.
प्रसादने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन आईसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्याने त्याच्या आईसोबतचे काही खास क्षण व्हिडीओतून शेअर केले आहेत. "Dear मम्मी...तुझ्यासोबतच्या काही आठवणी.. माझी निरागस, सुंदर, लढवय्यी आई. पूर्ण श्रद्धेने पूजा करणारी, आत्मियतेने शिकवणारी शिक्षिका आणि कलेची उपासक..प्रत्येक क्षण हसऱ्या चेहऱ्याने जगणारी...आई, खूप आठवण येतेय तुझी. आम्हा सगळ्यांनाच. आणि मला माहित आहे...तुला कळतंय", असं प्रसादने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
प्रसादच्या या पोस्टवर सेलिब्रिटींनी कमेंट करत त्याचं सांत्वन केलं आहे. प्रसाद आणि त्याच्या आईचं फार घट्ट नातं होतं. आईसोबतचे फोटो प्रसाद शेअर करताना दिसायचा. झी मराठीच्या अवॉर्ड सोहळ्यातही प्रसादचं अभिनंदन करण्यासाठी त्याच्या आई हजर होत्या. अमृताचंही तिच्या सासूबाईंसोबत जवळचं आणि भावनिक नातं होतं. त्यांनी कधीच सूनेसारखं वागवलं नसल्याचं अमृताने पोस्टमध्ये म्हटलं होतं.