एक था राजा एक थी राणी फेम ​अंजुम फकिह देवांशीमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2017 12:15 IST2017-02-13T06:45:50+5:302017-02-13T12:15:50+5:30

लीप घेण्याचा ट्रेंड सध्या छोट्या पडद्यावर चांगलाच गाजत आहे. मालिकेच्या कथानकाला वळण देण्यासाठी कथानकाला काही वर्षं पुढे नेण्याचा ट्रेंड ...

One was King One was Queen Fame Anjum Fakih Devashi | एक था राजा एक थी राणी फेम ​अंजुम फकिह देवांशीमध्ये

एक था राजा एक थी राणी फेम ​अंजुम फकिह देवांशीमध्ये

प घेण्याचा ट्रेंड सध्या छोट्या पडद्यावर चांगलाच गाजत आहे. मालिकेच्या कथानकाला वळण देण्यासाठी कथानकाला काही वर्षं पुढे नेण्याचा ट्रेंड अनेक वर्षांपासून मालिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. थपकी प्यार की ही मालिका सात वर्षांचा लीप घेणार असल्याची बातमी नुकतीच आली होती. आता या मालिकेनंतर देवांशी ही मालिका काही वर्षांचा लीप घेणार आहे. लीपनंतर या मालिकेत प्रेक्षकांना नवीन जनरेशन पाहायला मिळणार आहे. या मालिकेत आता अनेक नवीन एंट्री होणार आहेत. 
देवांशी या मालिकेने लीप घेतल्यानंतर या मालिकेत देवांशी ही प्रमुख भूमिका कोण साकारणार याचा अद्याप निर्णय घेतला गेलेला नाही. देवांशी ही भूमिका या मालिकेतील सगळ्यात महत्त्वाची भूमिका असल्याने या भूमिकेसाठी छोट्या पडद्यावरच्या एखाद्या प्रसिद्ध कलाकाराची निवड केली जाईल अशी चर्चा आहे. या भूमिकेसाठी स्वरांगी या मालिकेमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री हेली शाहचा विचार केला जात असल्याचे म्हटले जात आहे. पण अद्याप तरी हेलीच्या नावाची अधिकृत घोषणा प्रोडक्शन हाऊसकडून करण्यात आलेली नाही. देवांशी या मालिकेच्या लीपनंतर या मालिकेच्या कथानकालादेखील अनेक वळणे मिळणार आहेत. प्रेक्षकांना आता या मालिकेत देवांशी, साक्षी आणि त्यांचा एक मित्र यांच्यातील लव्ह ट्रँगल पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील मुख्य अभिनेत्याची भूमिका कोण करणार याचीदेखील सध्या शोधाशोध सुरू आहे. 
या मालिकेतील एका भूमिकेसाठी एक था राजा एक थी राणी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अंजुम फकिहचा विचार केला जात असल्याचे म्हटले जात आहे. अंजुम आणि या मालिकेच्या निर्मात्यांची या मालिकेतील भूमिकेविषयी सध्या चर्चा सुरू आहे. 



Web Title: One was King One was Queen Fame Anjum Fakih Devashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.