OMG : प्रियांका चोप्रा म्हणते, तिला पाठलाग करणारे लोक आवडतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 15:31 IST2018-01-02T10:01:35+5:302018-01-02T15:31:35+5:30

अभिनेत्री प्रियांका चोप्राने एक हैराण करु टाकणारा खुलासा केला आहे. प्रियांकाला इन्स्टाग्राम पाठलाग करणारे लोक  आवडत असल्याचे तिने इंडियाज ...

OMG: Priyanka Chopra says she loves chasing people | OMG : प्रियांका चोप्रा म्हणते, तिला पाठलाग करणारे लोक आवडतात

OMG : प्रियांका चोप्रा म्हणते, तिला पाठलाग करणारे लोक आवडतात

िनेत्री प्रियांका चोप्राने एक हैराण करु टाकणारा खुलासा केला आहे. प्रियांकाला इन्स्टाग्राम पाठलाग करणारे लोक  आवडत असल्याचे तिने इंडियाज नेक्स सुपरस्टार्सच्या मंचावर सांगितले आहे. या गोष्टीचा खुलासा त्यावेळी झाला जेव्हा एक स्पर्धकांने प्रियांका आपलं प्रेरणा स्थान असल्याचे सांगितले. कारण त्यांने सुद्धा गॉडफादरचा हात डोक्यावर नसताना करिअरची सुरुवात केली आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर इथपर्यंत येईन पोहोचला आहे. त्या स्पर्धकांने आपण प्रियांकाला नियमित इन्स्टाग्रामवर फोलो करत असल्याचा खुलासा केला.  

यावर प्रियांका म्हणाली की, “माझ्याबद्दल तुला केवढे माहिती आहे हे पाहून मी प्रभावित झाले आहे. मला आवडते जेव्हा कुणी मला इन्स्टाग्रामवर माझा पाठलाग करते. माझी स्टोरी, पोस्ट्‌स किती जणांनी पाहिले आहेत हे मी स्वतः नियमितपणे चेक करते.” प्रियांका या शोमध्ये अतिथी जज्जच्या भूमिकेत दिसणार आहे.  

काही दिवसांपूर्वी पीसी आपल्या ड्रेसच्या किंमतीला घेऊन चर्चेत आली होती. दिल्लीत झालेल्या ‘पेंग्विन रॅण्डम हाऊस’च्या एका कार्यक्रमामध्ये प्रियांका पिंक कलरचा ड्रेस परिधान करत सगळ्यांचे लक्ष वेधले होते. या कार्यक्रमा दरम्यान अनेकांना प्रियांकावर नजरा हटवणे कठिण झाले होते. या ड्रेसची किंमत तब्बल दोन लाख रुपये असल्याचे कळते आहे. 

सध्या प्रियांका हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. ‘जय गंगाजल’नंतर तिने एकही बॉलिवूड चित्रपट साईन केलेला नाही. यावर्षीच्या सुरुवातीला प्रियांका  ‘बेवॉच’ या हॉलिवूडपटात एका निगेटीव्ह भूमिकेत दिसली होती. लवकरच प्रियांकाचे आणखी दोन हॉलिवूड सिनेमे रिलीज होणार आहेत. बरेली हे प्रियांकाचे मूळ गाव. येथील किला ओव्हर ब्रिजजवळ आजही प्रियांकाच्या पूर्वजांचे घर आहे. सध्या प्रियांका ‘क्वांटिको3’ या अमेरिकन टीव्ही सीरिजमध्ये बिझी आहे. प्रियांका चोप्रा आमिर खानसोबत चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे. आमिरच्या सैल्यूट' चित्रपटाचा भाग बनू शकते. यात  आमीर खान अंतराळवीर राकेश शर्मा यांची भूमिका साकारणार आहे. याच चित्रपटात प्रियांका त्याच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. याचे दिग्दर्शन महेश मथाई करणार आहेत.

ALSO READ :  पुरुषांनाही लैंगिक अत्याचाराला सामोरं जावं लागतं- प्रियांका चोप्रा
  
 

Web Title: OMG: Priyanka Chopra says she loves chasing people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.