OMG : ‘बिग बॉस’शोच्या स्पर्धकांची नावे झाली लीक; ढिंचॅक पूजासह सना सईद, निया शर्मा दाखविणार जलवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2017 18:52 IST2017-07-19T13:09:52+5:302017-07-19T18:52:31+5:30

टीव्ही जगतातील सर्वाधिक वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो म्हणून ओळखल्या जाणाºया ‘बिग बॉस’ शोच्या स्पर्धकांची यादी लीक झाल्याने खळबळ उडाली आहे. ...

OMG: Big bosses' names were leaked; Saina Saeed, Nia Sharma, with Dinkach Pooja | OMG : ‘बिग बॉस’शोच्या स्पर्धकांची नावे झाली लीक; ढिंचॅक पूजासह सना सईद, निया शर्मा दाखविणार जलवा!

OMG : ‘बिग बॉस’शोच्या स्पर्धकांची नावे झाली लीक; ढिंचॅक पूजासह सना सईद, निया शर्मा दाखविणार जलवा!

व्ही जगतातील सर्वाधिक वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो म्हणून ओळखल्या जाणाºया ‘बिग बॉस’ शोच्या स्पर्धकांची यादी लीक झाल्याने खळबळ उडाली आहे. या शोचा अकरावा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, प्रत्येक सीझनप्रमाणे हाही सीझन वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. कारण ज्या स्पर्धकांची यादी लीक झाली आहे, त्यावरून यंदाही प्रेक्षकांना काहीतरी धमाकेदार बघावयास मिळेल, असेच चित्र दिसत आहे. वास्तविक ही यादी म्हणजे दरवर्षीप्रमाणे चर्चेतील नावे असून, त्यातील कोणीही शोमध्ये सहभागी होण्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही; मात्र ज्या पद्धतीने ही नावे चर्चिली जात आहेत, त्यावरून यांचा घरात प्रवेश निश्चित मानला जात आहे. 



ढिंचॅक पूजा
आपल्या आगळ्या-वेगळ्या अन् काहीशा कंटाळवाण्या सिंगिंग स्टाइलमुळे चर्चेत आलेल्या ढिंचॅक पूजाचे नाव बिग बॉससाठी घेतले जात आहे. वास्तविक त्यास अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी तिच्या नावाची जोरदार चर्चा रंगत आहे. आपल्या अनोख्या स्टाइलने यू-ट्यूबवर धूम उडवून देणाºया ढिंचॅक पूजाचे नाव निश्चित झाल्यास बिग बॉसच्या घरात जोरदार वादंग उठेल, यात शंका नाही. 



सना सईद
सुपरहिट ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात शाहरूख खानची मुलगी अंजली हिची भूमिका साकारणारी सना सईद बिग बॉस शोमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. सनाला ‘स्टुडंट आॅफ द इअर’ या चित्रपटात बघण्यात आले होते. त्याचबरोबर ‘खतरो के खिलाडी’, ‘नच बलिए’, ‘झलक दिखला जा’ यांसारख्या शोमध्येही बघावयास मिळाली. त्यामुळे बिग बॉस सीझन ११ मध्ये तिचा प्रवेश निश्चित मानला जात आहे.  



निया शर्मा
‘जमाई राजा’मुळे चर्चेत आलेली टीव्ही अभिनेत्री निया शर्मा हिचे नावदेखील बिग बॉस शोसाठी घेतले जात आहे. गेल्यावर्षीच आशिया खंडातील सर्वाधिक सेक्सी महिलांच्या यादीत तिसरे स्थान पटकाविणारी निया सध्या चांगलीच चर्चेत आहे. नुकतीच ती ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्ये बघावयास मिळाली होती. निया आणि सना या दोघी जर बिग बॉसच्या घरात आल्या तर नक्कीच टीआरपीचा आकडा अपेक्षेपेक्षा अधिक उंची गाठेल. 



पर्ल पुरी
पर्ल पुरी याचेही नाव बिग बॉस शोसाठी घेतले जात आहे. ‘फिर भी ना माने बदतमीज दिल’, ‘मेरी सासू मॉँ’ आणि ‘नागुर्जना’ यांसारख्या शोमध्ये पर्लने आपल्या अभिनयाची जादू दाखविली. ‘मेरी सासू मॉँ’दरम्यान त्याचे नाव हिबा नवाब आणि आंचल खुराना यांच्याशी जोडले गेल्याने तो चांगलाच चर्चेत आला होता. त्यामुळे सेटवर या दोघींमध्ये खूपच तप्त वातावरण असायचे असेही बोलले जात होते. त्यामुळे पर्ल पुरी जर बिग बॉसच्या घरात सहभागी झाला तर घरातील वातावरण गढूळ होण्यास फार वेळ लागणार नाही, हे निश्चित.



अचिंत कौर 

बिग बॉसच्या अकराव्या सीझनमध्ये टीव्ही जगतातील प्रसिद्ध नाव अचिंत कौर हिचेही नाव बिग बॉससाठी समोर येत आहे. अचिंतला आतापर्यंत बºयाचशा डेलीसोपमध्ये बघण्यात आले आहे. ‘स्वाभिमान, बनेगी अपनी बात, विरुद्ध, क्योंकी सास भी कहीं बहू थी आणि कहानी घर घर की’ आदी मालिकांमध्ये अचिंतने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. ‘जमाई राजा’मध्ये तिची दुर्गादेवीची भूमिका खूपच गाजली होती. शिवाय बोल्ड फोटोशूटमुळेही ती चर्चेत आली होती.  



देवोलीना भट्टाचार्जी 

प्रसिद्ध मालिका ‘साथ निभाना साथिया’मधून लोकप्रिय झालेली देवोलीनादेखील बिग बॉसच्या घरात प्रवेश करू शकते. नुकत्याच केलेल्या बोल्ड फोटोशूटमुळे देवोलीना चर्चेत आली होती. तिचे हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यामुळे तिचे नावही बिग बॉससाठी निश्चित मानले जात आहे. दरम्यान, ही सहा नावे सध्या जोरदार चर्चिले जात असून, त्यांचा बिग बॉसच्या घरातील प्रवेश निश्चित मानला जात आहे. 

Web Title: OMG: Big bosses' names were leaked; Saina Saeed, Nia Sharma, with Dinkach Pooja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.