ओमने नलू मावशीने दिलेले चॅलेंज केले पूर्ण,धक्कादायक वळणावर होणार एपिसोडचा शेवट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 19:02 IST2021-07-26T18:59:32+5:302021-07-26T19:02:38+5:30
स्वीटूसोबत लग्न करायचे असेल तर मिळेल ते काम करत काबाड कष्ट करत दोन पैसे कमवावे लागतील अशी अट नलू मावशीने ओम घातली होती.

ओमने नलू मावशीने दिलेले चॅलेंज केले पूर्ण,धक्कादायक वळणावर होणार एपिसोडचा शेवट
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका अल्पावधीतच रसिकांची आवडती मालिका बनली. सुरुवातीलपासून रसिकांनी मालिकेला पसंती दिली. शकू, नलू, ओम, स्वीटू, चिन्या, रॉकी आणि मालिकेतील सर्व पात्र ही प्रेक्षकांना आपलीशी आणि आपल्यातलीच एक वाटतात. इतकंच काय तर या मालिकेतील खलनायिका म्हणजेच मालविका या व्यक्तिरेखेला देखील प्रेक्षकांनी उचलून धरलं आहे.मालिकेमुळेच कलाकारांच्या लोकप्रियतेत सुद्धा दिवसागणिक वाढ होत चालली आहे.
दिवसेंदिवस मालिकेत रंजक वळण पाहायला मिळत आहे. सध्या मालिकेत आनंदाचा माहोल पाहायला मिळत आहे. चिन्यालाही आता नोकरी मिळालीय, तर दुसरीकडे ओमनेही नलू मावशीचं मनं जिंकलं आहे. स्वीटूसोबत लग्न करायचे असेल तर मिळेल ते काम करत काबाड कष्ट करत दोन पैसे कमवावे लागतील अशी अट नलू मावशीने ओम घातली होती. ओमनेही भाजी विकत मोठ्या मेहनतीने अट पूर्ण केली आहे. त्यामुळे स्वीटूही प्रचंड आनंदित आहे.
मालिकेत आतापर्यंत सगळे आनंद आनंद सुरु असताना एपिसोडचा शेवट मात्र आता एका विलक्षण वळणावर होणार आहे. चिन्या ट्रेनमध्ये असताना त्याचा पाठलाग करणारा मोहित लपून चिन्याच्या हाताला पिन टोचतो.त्यामुळे चिन्या ट्रेनमधून तोड जातो आणि तो बाहेर पडताना दाखवण्यात आलंय. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय घडणार हे पाहण्याचीही चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. चिन्याचं पुढे काय होतं? ओम-स्विटूचं लग्न होणार का? की त्यांच्या लग्नामध्ये आणखी काही विघ्न येणार ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आगामी भागात उलगडणार आहेत.