जुन्या अंगूरीचा नव्या अंगूरीला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2016 18:07 IST2016-04-21T15:05:50+5:302016-05-01T18:07:52+5:30

‘भाभी जी घर पर हैं’ मालिकेत अंगूरी भाभीची भूमिका साकारणाºया शिल्पा शिंदेची नाराजी लपता लपत नाहीयं. शिल्पाच्या जागी नवी ...

The old finger binds to the new finger | जुन्या अंगूरीचा नव्या अंगूरीला टोला

जुन्या अंगूरीचा नव्या अंगूरीला टोला

ाभी जी घर पर हैं’ मालिकेत अंगूरी भाभीची भूमिका साकारणाºया शिल्पा शिंदेची नाराजी लपता लपत नाहीयं. शिल्पाच्या जागी नवी अंगूरी भाभी अर्थात शुभांगी अत्रे आली. पण त्यामुळे शिल्पाचा जळफळाट चांगलाच वाढलायं. त्यामुळे शिल्पाने शुभांगीवर भडास काढली. एका मुलाखतीत शिल्पाने शुभांगीला ‘गुड कॉपी कॅट’ संबोधले. अंगूरीसारखे ड्रेसअप करणे, तिच्यासारखे दिसणे खूप सोपे आहे. पण तिची भूमिका साकारणे सोपे नाही, असे शिल्पा म्हणाली. एवढेच नाही तर शुभांगी चांगली अभिनेत्री आहे. पण तिने माझी नक्कल करणे बंद केले पाहिजे. आपल्या करिअरमध्ये काही ओरिजनल करायला हवे, असा टोलाही तिने शुभांगीला लगावला.
.............................................

शिल्पा शिंदे मैदानात! ‘सिंटा’वर गंभीर आरोप


‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेतून प्रसिद्धी पावलेली टीव्ही अभिनेत्री  शिल्पा शिंदे हिच्यावर ‘सिने एंड टेलीविजन आर्टिस्ट एसोसिएशन’(सिंटा)ने बंदी लादल्यानंतर आता शिल्पा ‘सिंटा’विरूद्ध मैदानात उतरली आहे. ‘भाभीजी घर पर हैं’च्या निर्मात्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप करीत शिल्पाने हा शो मध्येच सोडला होता. या प्रकरणी ‘सिंटा’ने शिल्पावर बंदी लादली आहे. मात्र आता शिल्पाने ‘सिंटा’वर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ‘सिंटा’ कलाकारांचे असोसिएशन आहे. मात्र प्रत्यक्षात कलाकारांना कवडीची मदत करीत नाही, असा आरोप तिने केला. जे कलाकार प्रति एपिसोडने काम करतात, त्यांना भाडे आणि रोजच्या कामाचे पैसे वेळेवर मिळावेत, अशी मागणी आम्ही ‘सिंटा’कडे केली. मात्र यादिशेने ‘सिंटा’ने काहीही प्रयत्न केले नाहीत. कलाकारांना कामाची गरज आहे आणि निर्माते याचा फायदा लाटत आहेत. अशास्थितीत ‘सिंटा’ने कलाकारांच्या हितासाठी काहीही केलेले नाही, असा दावाही तिने केला. ‘सिंटा’चे माजी सदस्य आरिफ शेख यांनीही शिल्पाची बाजू उचलून धरली. ‘सिंटा’ सदस्यत्व शुल्काच्या नावावर ३५ हजार रुपए घेते. निश्चित शुल्कापेक्षा ही रक्कम ५ हजारांनी जास्त आहे, असा ठपका त्यांनी ठेवला.
...................................................

​‘शिल्पाला कुणीच काम करण्यापासून रोखू शकत नाही’
शिल्पा शिंदेला कुणीच काम करण्यापासून रोखू शकत नाही, हे आम्ही नाही तर राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने(मनसे) म्हटले आहे. तसा इशाराच मनसेने दिला आहे.  ‘भाभी जी घर पे है’ या टीव्ही मालिकेमुळे लोकप्रीय झालेल्या शिल्पाला पाठींबा देत, मनसे तिच्याबाजूने मैदानात उतरला आहे. मनसेने या संपूर्ण प्रकरणाला मराठी रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रात शिल्पा शिंदेला काम करण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. शिल्पाला काम करू न देणारे निर्माते आणि वाहिन्यांशी मनसे आपल्या पद्धतीने निपटेल, असे मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमिय खोपकर यांनी म्हटले आहे. ‘भाभी जी घर पे है’ निर्मात्यांनी मानसिक छळ केल्याचा आरोप करीत शिल्पाने ही मालिका सोडण्याचे जाहिर केले होते. यानंतर शिल्पाचे हे वागणे अव्यवहार्य असल्याचे सांगत सिने अ‍ॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन व फेडरेशन आॅफ वेस्टर्न सिने असोसिएशनने शिल्पावर बंदी लादली होती. आम्ही कुठल्याही फेडरेशनला जुमानत नाही. शिल्पाला कुणी काम करण्यापासून रोखलेच तर आम्ही बघू. ही अनेकांना धमकी वाटत असेल तर तसेच सही, असेही मनसेने म्हटले आहे.

Web Title: The old finger binds to the new finger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.