Ohhh No:'जमाई राजा' मालिका घेणार रसिकांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2017 11:55 IST2017-02-28T06:25:53+5:302017-02-28T11:55:53+5:30

700 एपिसोडच्या सक्सेसनंतर आता 'जमाई राजा' ही मालिका रसिकांचा निरोप घेत आहे. 2014मध्ये सुरू झालेल्या 'जमाई राजा' या मालिकेने ...

Ohhh No: Message of seekers taking a series of 'Jamai Raja' | Ohhh No:'जमाई राजा' मालिका घेणार रसिकांचा निरोप

Ohhh No:'जमाई राजा' मालिका घेणार रसिकांचा निरोप

700
एपिसोडच्या सक्सेसनंतर आता 'जमाई राजा' ही मालिका रसिकांचा निरोप घेत आहे. 2014मध्ये सुरू झालेल्या 'जमाई राजा' या मालिकेने रसिकांचे तुफान मनोरंजन केले.या मालिकेत महिलांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात एका पुरूषावर लक्ष केंद्रीत केले गेले होते.ही मालिकेच्या कथानक आणि रवी दुबे साकारत असलेल्या भूमिकेमुळे प्रत्येक मुलीची आई आपल्यालाही मिळणारा जावई असा असो अशी स्वप्न रंगु लागल्या होत्या.रवी दुबे,निया शर्मा, अंचित कौर,मौली गांगुली, अपरा महेता शाइनी  दोशी यांच्या या मालिकेत प्रमुख भूमिका होत्या. येत्या 3 मार्चला या मालिकेचा शेवटचा भाग छोट्या पडद्यावर रसिकांना पाहता येणार असून या दिवशी ही मालिका 700 एपिसोड पूर्ण करत रसिकांनाही अखेरचा अलविदा म्हणणार आहेत.


या मालिकेतील रवी दुबेने रंगवलेली भूमिकेचे रसिकांकडून खूप कौतुकही झाले.मालिकेत लीपच्या आधी आणि लीप नंतर रवी दुबेची भूमिकेने रसिकांना खूप मनोरंजन केल्यामुळे जमाई राजा रसिकांना अलविदा करणे नक्कीच कठीण असणार आहे.याविषयी रवी दुबेने सांगितले की,या मालिकेसह आमचा सगळ्या कलाकरांचा प्रवास हा खूप आनंद देणारा ठरला.आम्हाला आजही वाटत नाहीय की मालिकेने 700 भाग पूर्ण केले आहेत. गेली 4 वर्ष आम्ही रसिकांचे मनोरंजन करत आहोत. या मालिकेमुळे घराघरांत आम्ही पोहचलो. रसिकांचे भरभरून मिळणारे प्रेम आणि आशिर्वाद यांमुळेच या मालिकेला यश मिळाले. रसिकांचे हेच आशिर्वाद आणि प्रेम घेवून आम्ही पुढच्या प्रवासाची सुरूवात करणार आहोत. पुन्हा एकदा रवी दुबे रसिकांच्या भेटीला नक्की येणार असे विश्वास देत आज अलविदा घेत असल्याचे त्याने म्हटले आहे. 

Also Read:'जमाई राजा' फेम रवी दुबेचे बर्थ डे सेलिब्रेशनला या अंदाजात पोहचले टीव्ही स्टार्स!

Web Title: Ohhh No: Message of seekers taking a series of 'Jamai Raja'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.