अरेच्चा! अभिनेता शालीन भानोत शीला की जवानी करण्याची इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2017 11:04 IST2017-04-08T05:34:37+5:302017-04-08T11:04:37+5:30
अभिनेता शालीन भानोत ऐतिहासिक मालिका ‘शेर-ए- पंजाब महाराजा रणजित सिंग’मध्ये महा सिंगची भूमिका करत आहे. तो सांगतो की तो ...

अरेच्चा! अभिनेता शालीन भानोत शीला की जवानी करण्याची इच्छा
अ िनेता शालीन भानोत ऐतिहासिक मालिका ‘शेर-ए- पंजाब महाराजा रणजित सिंग’मध्ये महा सिंगची भूमिका करत आहे. तो सांगतो की तो सगळ्या प्रकारच्या भूमिका करू इच्छितो आणि एखाद्या विशिष्ट प्रकारच्या कामाला त्याच्या प्रकारामुळे त्याला नाही म्हणायचे नाहीये.शालीनला अतिशय प्रणयी शो चा हिस्सा बनायचे आहे. एक अभिनेता म्हणून त्याला एका मर्यादेत राहायचे नसून कुठल्याही भूमिका करायला तो तयार आहे.“मी एंटरटेनर आहे. माझ्याकडे पर्याय असेल तर मला शीला की जवानी करायलासुद्धा आवडेल. मला बराच मोठा पल्ला गाठायचाय. पण मला एक पूर्णपणे रोमांटिक शो करायचाय. मी ते याआधी कधीच केलेले नाही.” असे शालीन भानोत म्हणाला.शालीनला त्याच्या कामाबद्दल सगळं काही आवडतं. “काहीतरी निर्माण करण्याची भावना तुम्हांला अभिनयातून मिळते आणि ती जबरदस्त आहे. मी जेव्हा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची भूमिका करतो तेव्हा मी दुसऱ्यांचे मनोरंजन करत असतो. आम्ही कलाकार कोणी विचारही करू शकणार नाही अशा व्यक्ती बनतो.”असेही तो पुढे म्हणाला.शालीन हा शीख नाही किंवा पंजाबीही नाही. तरीही त्याला ही भूमिका देऊ करण्यात आल्यावर त्याला धक्काच बसला होता. तरीही एक आव्हान म्हणून शालीनने रणजितसिंग यांचे वडील महासिंग यांची भूमिका स्वीकारली. “मी आता एक दशकभर अभिनय क्षेत्रात असलो, तरी ही भूमिका माझी आजवरची सर्वात आव्हानात्मक होती. कारण मला पंजाबी भाषा येत नाही. नवी भाषा शिकण्यात मजा येत असली, तरी कधी कधी त्याचा कंटाळाही येत होता.त्यातील अस्सी, तुस्सी, भाभी यासारखे शब्द उच्चारणं आणि त्यांचा वापर करणं हे जड जात होतं. परंतु सर्वात कठीण काम घोडेस्वारी शिकण्याचं होतं. त्यामुळे मी पुरता त्रासून गेलो,” असे शालीनने सांगितले.