​परिचारिकांची कपिलला धमकी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 21:20 IST2016-05-17T15:50:42+5:302016-05-17T21:20:42+5:30

कपिल शर्माचा ‘दी कपिल शर्मा शो’ गाजत असला तरी या शोमध्ये नर्स अर्थात परिचारिकांवर विनोद करणे त्याला भाग पडू ...

Nurse threatens Kapil? | ​परिचारिकांची कपिलला धमकी?

​परिचारिकांची कपिलला धमकी?

िल शर्माचा ‘दी कपिल शर्मा शो’ गाजत असला तरी या शोमध्ये नर्स अर्थात परिचारिकांवर विनोद करणे त्याला भाग पडू शकते. मंगळवारी अमृतसरमध्ये अनेक परिचारिकांनी एकत्र येत हा शो आणि तो  होस्ट करणारा कपिल शर्माचा निषेध नोंदवला. कपिल शर्माचा पुतळाही यावेळी जाळण्यात आला. कपिल शर्माने त्याच्या शोमध्ये परिचारिकांची खिल्ली उडवली आहे. याबद्दल माफी मागावी, अन्यथा पोलिसांत एफआयआर दाखल करू, अशा इशाराही या परिचारिकांनी दिला. ‘ शोमध्ये नर्सला बिभत्सपणे दाखवण्यात आले आहे. यामुळे आमची प्रतीमा मलिन होत आहे, असे या परिचारिकांचे म्हणणे आहे.दी कपिल शर्मा’ शोमध्ये नर्सचे कॅरेक्टर ठेवण्यात आले आहे. मॉडेल व अभिनेत्री रोशेल नर्सची व्यक्तिरेखा साकारत आहे. आता हे प्रकरण काय वळण घेते, ते बघूयात!!

Web Title: Nurse threatens Kapil?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.