"आता नात्याचे दरवाजे बंद केले आहेत...", १९ वर्षांचा संसार मोडल्यानंतर अंगुरी भाभीनं व्यक्त केलं दुःख

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 10:40 AM2023-12-14T10:40:30+5:302023-12-14T10:40:57+5:30

Shubhangi Atre : हिंदी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'भाभीजी घर पर है'मध्ये अंगूरी भाबीची भूमिका अभिनेत्री शुभांगी अत्रेने साकारली होती. या भूमिकेतून तिला घराघरात ओळख मिळाली.

"Now the doors of the relationship have been closed...", Anguri Bhabhi expressed her grief after the breakup of her 19-year-old life | "आता नात्याचे दरवाजे बंद केले आहेत...", १९ वर्षांचा संसार मोडल्यानंतर अंगुरी भाभीनं व्यक्त केलं दुःख

"आता नात्याचे दरवाजे बंद केले आहेत...", १९ वर्षांचा संसार मोडल्यानंतर अंगुरी भाभीनं व्यक्त केलं दुःख

हिंदी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'भाभीजी घर पर है'मध्ये अंगूरी भाबीची भूमिका अभिनेत्री शुभांगी अत्रेने साकारली होती. या भूमिकेतून तिला घराघरात ओळख मिळाली. शुभांगी तिच्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत आली होती जेव्हा तिने आपले १९ वर्षांचे लग्न मोडले होते आणि पतीपासून वेगळी झाली होती.

लग्नाच्या १९ वर्षांनंतर नवरा पियुषसोबत वेगळी झालेल्या शुभांगी अत्रेचे म्हणणे आहे की, तिच्या कामाच्या बाबतीत खूप सीरियस आहे आणि आता तिने फक्त तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत केले आहे. शुभांगी अत्रे भाबीजी घर पर है या मालिकेत बऱ्याच वर्षांपासून अंगूरी भाभीची भूमिका साकारुन खूश आहे. नंतर तिच्या जागी शिल्पा शिंदे आली. त्यावर शुभांगी हसत हसत म्हणाली, 'या शोमध्ये मला भाबीजीची भूमिका करून आठ वर्षे झाली आहेत आणि आता मी जगत भाभीजी झाली आहे'.

नुकतीच शुभांगी लखनऊमध्ये आली होती. यावेळी तिने शिल्पाच्या जागी काम करण्याचा निर्णय घेतला. ती म्हणाली की, 'माझ्या आईसह अनेकांना वाटले होते की मी भाभीजीची भूमिका करू शकणार नाही. फक्त मला माहित होते की मी ती भूमिका उत्तमरित्या साकारु शकेन. आता भाभीजींसोबत एका कॉमेडियनचा टॅग मिळाल्याने मी खूश आहे.

'मी प्रेमाला दुसरी संधी कधीच देणार नाही...'
प्रेमाविषयी बोलताना शुभांगी म्हणाली, 'माझ्यासाठी हा खूप चढ-उतारांचा प्रवास आहे. वयाच्या २०व्या वर्षी माझं लग्न झाले. हे सोपे नव्हते पण आता ते घडले आहे हे मला मान्य आहे. मला वाटत नाही की मी भविष्यात प्रेमाला आणखी एक संधी देईन, मी करू शकत नाही. आता आयुष्यातील जोडीदार हेच माझे काम आहे. मी आता नात्याचे दरवाजे पूर्णपणे बंद केले आहेत.

Web Title: "Now the doors of the relationship have been closed...", Anguri Bhabhi expressed her grief after the breakup of her 19-year-old life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.