n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">कविता कौशिकची एफआयआर या मालिकेतील चंद्रमुखी चौटाला ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेत तिने एका पोलिस इन्पेक्टरची भूमिका साकारली होती. या मालिकेत हरयाणी पद्धतीमध्ये हिंदी बोलण्याची कविताची स्टाईल खूप फेमस झाली होती. आता कविता डॉ. भानुमती ऑन ड्युटी या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत ती डॉक्टरची भूमिका साकारणार आहे. या मालिकेत ती हरयाणी भाषेत न बोलता राजस्थानी भाषेत बोलणार आहे. ती या मालिकेत राजस्थानमधील एका महाराजाची मुलगी असल्याचे दाखवण्यात आले आहे.