"आता तर खरी सुरुवात आहे…", अंकिता वालावलकरची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 16:36 IST2025-11-26T16:36:24+5:302025-11-26T16:36:57+5:30
Ankita Walawalkar : नुकतेच अंकिता वालावलकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने आयुष्यातील चढ-उतारांवर आणि आलेल्या अडचणींवर मात करून पुढे जाण्याचा तिचा निर्धार व्यक्त केला आहे.

"आता तर खरी सुरुवात आहे…", अंकिता वालावलकरची पोस्ट चर्चेत
सोशल मीडिया स्टार अंकिता वालावलकर सतत चर्चेत येत असते. बिग बॉस मराठी शोमध्ये सहभागी झाल्यानंतर तिच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. ती सोशल मीडियावर चाहत्यांना नेहमीच अपडेट देत असते. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर एक अत्यंत प्रेरणादायी आणि भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने आयुष्यातील चढ-उतारांवर आणि आलेल्या अडचणींवर मात करून पुढे जाण्याचा तिचा निर्धार व्यक्त केला आहे.
अंकिताने फोटो शेअर करत लिहिले की, "रडलेले दिवसही आहेत आणि तुटलेले क्षणही… पण प्रत्येक वेळी मी स्वतःलाच सावरलं आणि उभ केलं कारण माझी गोष्ट इथे संपणारी नाही आता तर खरी सुरुवात आहे….." तिच्या या शब्दांतून तिची मानसिक शक्ती आणि जिद्द स्पष्टपणे दिसून येते. अनेकदा कलाकारांना पडद्यामागे अनेक संघर्षांना तोंड द्यावे लागते, अशा वेळी अंकिताच्या या शब्दांनी तिच्या चाहत्यांना मोठा आधार आणि प्रेरणा दिली आहे. या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी आणि कलाकारांनी कमेंट करून तिला प्रोत्साहन दिले आहे. तिच्या या सकारात्मक दृष्टिकोनाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
वर्कफ्रंट
अंकिता वालावलकर बिग बॉस मराठी ५ शोमध्ये सहभागी झाली होती. या शोमधून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्यानंतर काही रिएलिटी शोमध्ये झळकली. अंकिता ही एक यशस्वी व्यावसायिक देखील आहे.