आता कॉमेडी क्वीन भारती सिंह म्हणणार हम भी है ‘खतरों के खिलाडी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 14:11 IST2018-05-18T08:41:21+5:302018-05-18T14:11:21+5:30
रसिकांना खळखळून हसायला लावत त्यांचं तुफान मनोरंजन करणारी कॉमेडी क्वीन भारती सिंह लग्नानंतर संसारात बिझी झाली की काय असा ...

आता कॉमेडी क्वीन भारती सिंह म्हणणार हम भी है ‘खतरों के खिलाडी’
र िकांना खळखळून हसायला लावत त्यांचं तुफान मनोरंजन करणारी कॉमेडी क्वीन भारती सिंह लग्नानंतर संसारात बिझी झाली की काय असा प्रश्न कदाचित तिच्या चाहत्यांना पडला असणार.मात्र आता भारती पुन्हा रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. यावेळी ती कॉमेडी करणार नाही तर मोठ्या हिमतीने एक से बढकर एक हटके खतरनाक टास्क पूर्ण करताना दिसणार आहे.‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शो च्या ‘९’ व्या सिझनमध्ये भारती एंट्री करणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या शोमध्ये भारती एकटीच सहभागी होणार नसून तिच्यासोबत पती हर्ष लिंबाचिया हा देखील या शोमध्ये भाग घेणार आहे.नुकतेच भारतीने ‘खतरों के खिलाडी’ या शोचे शूटिंगही पूर्ण केले आहे.त्यामुळे पुढचे दोन महिने तरी तिला दुस-या शोचा भाग होता येणार नसल्याचेही कळतंय.
'खतरों के खिलाडी' 8 व्या सिझनमध्ये गीता फोगाट, लोपामुद्रा राऊत,मनु पंजाबी, मनवीर गुर्जर, करन वाही, शांतनु माहेश्वरी, शिवानी डांडेकर, निया शर्मा, हिना खान, रवि दुबे, मोनिका डोगरा, शाइनी दोशी, रित्विक धन्जानी हे स्पर्धक शोमध्ये सहभागी झाले होते.हिना खानची लोकप्रियता पाहाता हिना खानच 'खतरों के खिलाडी 8वे' सिझन जिंकणार असे सा-यांनाच वाटत होते.मात्र हिना खान नाही तर शांतनु माहेश्वरीने हे 8वे पर्व जिंकले होते.या कार्यक्रमाची कंसेप्ट पाहाता प्रत्येक कंटेस्टंटला खतरनाक स्टंट दिले जातात.एरव्ही आपल्या कॉमेडीने,भूमिकेमुळे मनोरंजन करणारे कलाकार या शोमध्ये असे अनेक एक से बढकर एक स्टंट करत रसिकांचे फुल ऑन मनोरंजन करत असतात.खतरो के खिलाडींचा 8 वा सिझन स्पेनमध्ये पार पडला.आणि आता 8 वा सिझन युरोपमध्ये होणार आहे.
बिग बॉस 11 या रिअॅलिटी शो मध्ये प्रचंड लोकप्रियता मिळविणारी अर्शी खानही ‘खतरों के खिलाडी’ 9 सिझनमध्ये झळकणार आहे. अर्शी कॉमन मॅन बनून ‘बिग बॉस’च्या घरात पोहोचली होती. सध्या अर्शी आपल्या फिटनेसवर सर्वाधिक लक्ष देत आहे.