n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">कसम तेरे प्यार की ही मालिका लवकरच लीप घेणार आहे. या मालिकेत सध्या क्रितिका सेनगर, शरद मल्होत्रा प्रमुख भूमिका साकारत आहेत. पण लीपनंतर क्रितिकाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. क्रितिका मालिका सोडतेय ही बातमी मीडियात आली असतानाच आणखी एक बातमी ऐकायला मिळत आहे. या मालिकेत शरदच्या छोट्या भावाची भूमिका साकारणारा झुबेर खानही मालिकेच्या लीपबाबत खूश नाहीये. लीपनंतर त्याला त्याच्याच वयाच्या मुलाच्या वडिलांची भूमिका साकारावी लागणार आहे. त्याला हे मान्य नसल्याने त्यानेही कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळतेय.
![]()