आता ही अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2016 18:54 IST2016-11-16T15:44:32+5:302016-11-16T18:54:08+5:30
क्योंकी साँस भी कभी बहू थी, कुंडली यांसारख्या मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री प्राची शाह लवकरच एका मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार ...

आता ही अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
क योंकी साँस भी कभी बहू थी, कुंडली यांसारख्या मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री प्राची शाह लवकरच एका मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. प्राची ही अभिनेत्री असण्यासोबतच प्रसिद्ध कथ्थक डान्सर आहे. ये प्यार को क्या नाम दूँ या मालिकेत ती काही महिन्यांपूर्वी झळकली होती आणि एक श्रृंगार... स्वाभिमान या मालिकेत ती दोन मुलींच्या आईची भूमिका साकारणार आहे.
एक श्रृंगार... स्वाभिमान या मालिकेत प्रेक्षकांना दोन बहिणांची कथा पाहायला मिळणार आहे. सध्या अनेक मुलींना लग्न आणि करियर या दोन गोष्टी सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. अशाच लग्न आणि करियर अशा दोन गोष्टींमध्ये अडकलेल्या बहिणींचा प्रवास या मालिकेद्वारे दाखवला जाणार आहे. या मालिकेत संगीता चौहान आणि अंकिता शर्मा या दोन अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारणार असून प्राची त्यांच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेतील कुटुंब हे राजस्थानमधील बुंदी या छोट्याशा खेडेगावात राहाताना दाखवले जाणार असून या मालिकेची कथा एका पारंपरिक मारवाडी कुटुंबाभोवती फिरणार आहे. या दोन्ही मुली प्रचंड हुशार आहेत. आपल्या कुटुंबाला आपला अभिमान वाटावा अशी गोष्ट करावी असे त्यांना वाटते. आपल्या आईसाठी काहीही करण्याची त्यांची तयारी आहे.
या मालिकेत विनय जैन, सुचित्रा पिल्लईदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. एक श्रृंगार... स्वाभिमान या मालिकेत काम करण्यासाठी प्राची प्रचंड उत्सुक आहे. या मालिकेचे चित्रीकरण सुरू झाले असून लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Suchitra Pillai