रिश्तों का चक्रव्यूह मालिकेतील महिमा मकावाणा तिच्यापेक्षा वयाने नऊ वर्षं मोठ्या असलेल्या अभिनेत्याच्या पडली प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 15:26 IST2018-02-01T09:56:28+5:302018-02-01T15:26:28+5:30
रिश्तों का चक्रव्यूह या मालिकेची कथा ही खूप वेगळी असून प्रेक्षकांना माय-लेकीची कथा या मालिकेत पाहायला मिळत आहे. या ...

रिश्तों का चक्रव्यूह मालिकेतील महिमा मकावाणा तिच्यापेक्षा वयाने नऊ वर्षं मोठ्या असलेल्या अभिनेत्याच्या पडली प्रेमात
र श्तों का चक्रव्यूह या मालिकेची कथा ही खूप वेगळी असून प्रेक्षकांना माय-लेकीची कथा या मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत माय-लेकींमधील कडवट कथा गुंफण्यात आली असून या मालिकेचे कथानक एका शाही औद्योगिक घराण्याशी संबंधित आहे. महिमा मकावाणाने आतापर्यंत बालिकावधू, सपने सुहाने लडकपन के, अधुरी कहानी हमारी, दिल की बाते दिल ही जाने यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. चक्रव्यूह या मालिकेत महिमा प्रेक्षकांना प्रमुख भूमिकेत दिसत आहे. ती या मालिकेत अनामी ही भूमिका साकारत असून या मालिकेत ती १७ वर्षांची असल्याचे दाखवण्यात आले आहे. खऱ्या आयुष्यात देखील महिमा केवळ १८ वर्षांची आहे. ही मालिका सुरू झाल्यापासून या मालिकेतील अभिनयामुळे महिमा चर्चेत आली आहे. पण आता एका वेगळ्याच कारणामुळे महिमाच्या नावाची चर्चा होत आहे. या मालिकेतील एका कलाकारासोबत तिचे प्रेम प्रकरण सुरू असल्याचे म्हटले जात आहे. महिमा आपला को-अॅक्टर अंकित सिवचला डेट करतेय अशा बातमच्या येत आहेत. अंकित हा रिश्तों का चक्रव्यू या मालिकेमध्ये सीबीआय ऑफिसरची भूमिका साकारतोय. अंकित हा खऱ्या आयुष्यात महिमापेक्षा नऊ वर्षांनी मोठा आहे. महिमा फक्त १८ वर्षांची आहे तर अंकित २७ वर्षांचा आहे. ते मालिकेच्या सेटवर जास्तीत जास्त वेळ एकमेकांसोबत घालवतात. तसेच ते चित्रीकरणाला देखील एकत्र येत असल्याचे म्हटले जाते. त्यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा चांगलीच रंगली आहे.
![ankit siwach]()
महिमा आणि अंकितच्या प्रेमप्रकरणाची चर्चा असली तरी महिमाने या सगळ्या गोष्टींपेक्षा तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे तिच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना आणि घरातल्यांना वाटत आहे. कोणत्या गोष्टीचा तिच्या मालिकेवर परिणाम होऊ नये असे त्यांना वाटत आहे. या आधी देखील महिमाच्या काही अफेअरची चर्चा झाली होती आणि त्याचा परिणाम तिच्या करिअरवर झाला होता. त्यामुळे या प्रेमप्रकरणांपासून तिने दूर राहावे असे तिच्या जवळच्या व्यक्तींना वाटत आहे.
Also Read : चक्रव्यूह या मालिकेच्या सेटवर महिमा मकवाणाला झाला अपघात