'सुंदरा मनामध्ये भरली'मधून एक नाही तर तब्बल पाच कलाकारांनी घेतला निरोप, जाणून घ्या कोण आहेत ते

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 14:09 IST2022-03-08T14:09:25+5:302022-03-08T14:09:55+5:30

Sundara Manamadhye Bharli: 'सुंदरा मनामध्ये भरली' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झालीय. कारण की चार कलाकारांनंतर आता पाचव्या कलाकाराने देखील ही मालिका सोडल्याची माहिती मिळत आहे.

Not one but five artists took leave from 'Sundara Manamade Bharli', find out who they are | 'सुंदरा मनामध्ये भरली'मधून एक नाही तर तब्बल पाच कलाकारांनी घेतला निरोप, जाणून घ्या कोण आहेत ते

'सुंदरा मनामध्ये भरली'मधून एक नाही तर तब्बल पाच कलाकारांनी घेतला निरोप, जाणून घ्या कोण आहेत ते

कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका सुंदरा मनामध्ये भरली(Sundara Manamadhye Bharli)ने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झालीय. कारण की चार कलाकारांनंतर आता पाचव्या कलाकाराने देखील ही मालिका सोडल्याची माहिती मिळत आहे. याबाबत या कलाकाराने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे. 

सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमध्ये लतिका आणि अभ्या यांची कहाणी दाखवण्यात आली आहे. लतिकाची भूमिका या मालिकेमध्ये अक्षय नाईक हिने केली आहे. तर‌ अभ्याची भूमिका ही समीर परांजपे याने साकारली आहे. समीर परांजपे या आधी देखील आपल्याला अनेक मालिका आणि काही चित्रपटात देखील काम केले आहे. या मालिकेमध्ये दौलत, सज्जनराव, बापू यांच्या भूमिकादेखील लोकप्रिय ठरलेल्या आहेत. या मालिकेमध्ये अतिशा नाईक, उमेश दामले यांच्या देखील भूमिकांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या मालिकेतून चार जणांनी काढता पाय घेतला आहे.


या मालिकेमध्ये अभ्याच्या वहिणीची भूमिका साकारणारी प्रणिती नरके हिने ही मालिका काही महिन्यांपूर्वी सोडली होती. चेहऱ्याला एलर्जी झाल्याचे कारण देऊन तिने ही मालिका सोडली होती. त्यानंतर दौलतच्या वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेते धनंजय वाबळे यांनी देखील ही मालिका सोडली आहे. त्याचप्रमाणे या मालिकेतील तिसरा धक्का हा बसला तो गौरी किरणमुळे. गौरी किरण ही या मालिकेमध्ये लतिकाच्या बहिणीची भूमिका साकारत होती. मात्र, तिने देखील ही मालिका सोडली आहे. त्यानंतर या मालिकेतून पूजा पुरंदरे हिने देखील मालिका सोडली. पूजा पुरंदरे हिने या मालिकेमध्ये कामिनी म्हणजेच मिस नाशिक ही भूमिका केली होती. या सर्व कलाकारांनी मालिका सोडण्याचे कारण हे वेगवेगळे आहे. कुणाचे मानधनाचे कारण आहे, तर कुणाचे शेड्युलचे कारण आहे.

आता या मालिकेतून पाचवी कलाकार आदिती द्रविडने निरोप घेतवा आहे. तिने या मालिकेमध्ये नंदिनीची भूमिका साकारली आहे. नंदिनी हे पात्र आता संपुष्टात येणार आहे‌. कारण आदिती द्रविडने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना ही माहिती दिलेली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आदिती ही म्हणाली की, २७ ऑगस्ट रोजी हा प्रवास सुरू झाला होता. केवळ मी दोन महिन्याची पाहुणी या मालिकेसाठी होते. मात्र, पाहता पाहता हे पात्र सहा महिन्यांचे झाले. मात्र, आता कुठेतरी ऑफिशियल बाय-बाय करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मी सगळ्या प्रेक्षकांना बाय-बाय करत आहे, असे म्हणत तिने आपण मालिका सोडत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे यापुढे आता नंदिनी ही भूमिका मालिकेत दिसणार नाही.

Web Title: Not one but five artists took leave from 'Sundara Manamade Bharli', find out who they are

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.