नीती टेलरला मिळाली सारिका धिल्लनच्या रूपात एक बेस्टफ्रेंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2017 15:31 IST2017-03-03T06:53:05+5:302017-03-03T15:31:21+5:30
नुकतेच रतन राजपुत आणि देबीना बॅनर्जी या दोघींचे एकमेकींसह पटत नाही,मालिकेच्या शूटिंगवेळी या दोघेही फक्त शूटिंगपुरतेच काही वेळ एकत्र ...

नीती टेलरला मिळाली सारिका धिल्लनच्या रूपात एक बेस्टफ्रेंड
न कतेच रतन राजपुत आणि देबीना बॅनर्जी या दोघींचे एकमेकींसह पटत नाही,मालिकेच्या शूटिंगवेळी या दोघेही फक्त शूटिंगपुरतेच काही वेळ एकत्र असतात. सीन्स शूट झाल्यानंतर या दोघींना एकमेकांचे तोंडही बघणे आवडत नाही. त्यामुळे या दोघांची कॅटफाईटही चर्चेचा विषय बनलेली असताना 'गुलाम' मालिकेतील या दोन अभिनेत्रींनी मात्र त्यांच्या मैत्रीची मिसाल दिली आहे.'गुलाम' मालिकेतील नीती टेलर आणि सारिका धिल्लन या दोन्ही अभिनेत्री शूटिंगदरम्यान एकत्र तर असतात. मात्र शूटिंग संपल्यानंतरही या एकत्र वेळ घालवत असतात.या दोघींच्या मैत्रीचे सेटवरही इतर कलाकार खूप कौतुक करतात.याविषयी नीती सांगते,सेटवर सर्वांशीच माझे छान जमते पण सारिकाची बातच न्यारी आहे.जसा वेळ मिळेन तसा पॅकअपनंतर,सुट्टीच्या दिवशी आम्ही एकत्र ड्राईव्हला जातो,सिनेमाला जातो आणि खूप सारी मज्जा करतो.तर सारिका नीतीविषयी सांगते,नीतीला मजा करायला आवडते.प्रेमाने मी तिला 'लड्डु' म्हणते.मालिकेमुळे मला तिच्या रूपात एक चांगली मैत्रीण भेटली आहे.त्यामुळे आम्ही एकमेकांची कंपनी एन्जॉय करतो. कामातही आनंद वाटतो. उलट इंडस्ट्रीत ज्या कॅटफाईट रंगतात त्या कलाकारांनीही आमच्याकडून प्रेरणा घेत आपली मैत्री टिकवावी असे मला इतरांनाही सांगावेसे वाटते.