निर्मला कि शांभवी कोण होणार सर्जा पासून दूर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2017 15:21 IST2017-05-04T09:51:01+5:302017-05-04T15:21:01+5:30
'चाहूल' मालिकेमध्ये सध्या भोसले वाड्यावर शांभवी वाड्यामध्ये असलेल्या भुताच्या शोधात आहे. निर्मला शांभवीच्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे, ...
.jpg)
निर्मला कि शांभवी कोण होणार सर्जा पासून दूर?
' ;चाहूल' मालिकेमध्ये सध्या भोसले वाड्यावर शांभवी वाड्यामध्ये असलेल्या भुताच्या शोधात आहे. निर्मला शांभवीच्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे, कारण निर्मलाला भीती आहे कि, जर शांभवीला वाड्यातील भूता बद्दल कळाल तर ती सर्जा पासून कायमची दूर होईल. म्हणूनच निर्मलाने शांभवीला चकवा देण्यासाठी भोसले वाड्यामध्ये लहान भूत आणले होते जिचे नाव स्नेहा होते. पण आता निर्मला तिनेच रचलेल्या खेळामध्ये पुरती फसली आहे ती तिच्याच जाळ्यात अडकली आहे कारण, स्नेहा तर वाड्यातून निघून गेली पण तिच्या जाण्याने निर्मलाच्या सगळ्या शक्ती निघून गेल्या आहेत आणि हे तिला वाड्यात आल्यावर कळतं. निर्मला आता चांगलीच संतापली आहे. तसेच, भानुमतीने तिला दिलेल्या नकारामुळे निर्मला वाईट शक्तींच्या मार्गावर गेली आहे. वाईट शक्तींच्या मदतीने तिच्या शक्ती परत मिळाल्या आहेत पण त्याबदल्यात आता तिला महादेवचा बळी द्यावा लागणार आहे. हे सगळ होत असताना स्नेहा शांभवीला वाड्यामध्ये कोणाचा तरी खून झाला आहे हे एका वेगळ्याच पद्धतीने सांगितले आहे. त्यामुळे आता शांभवी वाड्यामध्ये कोणाचा खून झाला आहे याच्या शोधात आहे. आता शांभवी निर्मलाच्या खुनाचे सत्य सर्जाला कसे सांगणार ? सर्जाला ते कळणार का ? कि निर्मला कुठला नवा सापळा रचणार ? हे बघणे रंजक असणार आहे.या सगळ्या अघटीत घटना घडत असतानाच आता वाड्यावर बबन्या आल्याने नवे वळण आले आहे. बबन्याला शांभवी वाड्यावर घेऊन येते, आणि वाड्यातील सगळ्यांच धक्का बसतो,पण सर्जा खुश आहे कारण त्याला आता निर्मला कुठे आहे हे नक्कीच कळेल अशी खात्री आहे. परंतु, लवकरच बबन्या शांभवीला सांगणार आहे निर्मलाचा खून झाला आहे पण निर्मलाच्या रचलेल्या सापळ्यात बबन्या आणि शांभवी पुरते अडकणार आहेत आणि सर्जासमोर शांभवी खोट्यात पडणार आहे? हे नक्की काय झाल आहे या प्रश्नाच उत्तर तुम्हाला चाहूल मालिकेत मिळणार आहे. परंतु या सापळ्यामधून देखील शांभवी बाहेर पडते आणि सर्जाला घेऊन जंगला मध्ये पोहचते. आता जंगलामध्ये काय होणार ? निर्मलाच्या मृत्यूचे रहस्य कसं बबन्याद्वारे सर्जाला कळणार ? कि, सर्जा आणि शांभवीच्या मैत्रीत दुरावा येणार ? अश्या अनेक प्रश्नाची उत्तरे प्रेक्षकांन लवकरच मिळणार आहे.