Big Boss 16 : शिवसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली निमृत कौर, म्हणाली, 'आम्ही दोघं...'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 03:23 PM2023-02-14T15:23:32+5:302023-02-14T15:24:18+5:30

शिव ठाकरेने बिग बॉसमध्ये घरातील सर्वच सदस्यांचे मन जिंकले होते.

Nimrit Kaur speaks for the first time about her relationship with Shiv Thackeray | Big Boss 16 : शिवसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली निमृत कौर, म्हणाली, 'आम्ही दोघं...'

Big Boss 16 : शिवसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली निमृत कौर, म्हणाली, 'आम्ही दोघं...'

googlenewsNext

Big Boss 16 :  बिग बॉस हिंदी १६ चा अंतिम सोहळा नुकताच पार पडला. पुण्याच्या एमसी स्टॅनने (MC Stan) विजेतेपद नावावर केले तर मराठमोळा शिव ठाकरे (Shiv Thakre) रनर अप ठरला. शिव ठाकरेला प्रचंड पाठिंबा असताना एमसी स्टॅनने बाजी मारली. शिव ठाकरेने बिग बॉसमध्ये घरातील सर्वच सदस्यांचे मन जिंकले होते. शिव आणि निमृत कौर (Nimrit Kaur) यांच्या नात्याचीही चर्चा चांगलीच रंगली होती. आता निमृत कौरने स्वत:च याबाबत खुलासा केला आहे. 

बिग बॉस १६ मध्ये 'मंडली'ची खूपच चर्चा होती. शिव, एमसी स्टॅन, निमृत हे सर्व या मंडली मध्ये होते. शिव आणि निमृतची मैत्री चर्चेचा विषय ठरली होती. त्यांच्यातील जवळीक बघून चाहत्यांना दोघांवरही संशय येत होता. दोघांमध्ये प्रेम फुलत असल्याचं बोललं जात होतं. आता बिग बॉस संपलं आहे. सर्व सदस्य बाहेर आले. अनेक जण मुलाखतींमधून काही खुलासे करताना दिसत आहेत. 

सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत निमृतने शिवसोबतच्या नात्याबाबत खुलासा केला आहे. निमृत म्हणाली, 'घरातून बाहेर पडल्यानंतर शिमृतसाठी आम्ही खूश आहोत हेच मला ऐकू येत होते. पण आमच्यात फक्त मैत्रीचं नातं आहे. आम्ही डेट करत नाही आहोत. '

ती पुढे म्हणाली, 'नात्यात विश्वास नसेल तर मी अत्यंत वाईट रिलेशनशिपचाही सामना केला आहे. पण सध्या मी ज्याच्यासोबत आहे आमच्या नात्यात खूप समजुतदारपणा आहे. बिग बॉसच्या घरात जे झालं ते बघुन तो दुखावला. पण समजुतदारपणा असल्याने काही अडचण आली नाही. गेल्या अडीच वर्षांपासून मी रिलेशनशिपमध्ये आहे.'

Web Title: Nimrit Kaur speaks for the first time about her relationship with Shiv Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.