निक्की तांबोळी 'तिकीट टू फिनाले' मिळवून पोहोचली थेट बिग बॉसच्या फायनलमध्ये! सूरजला टास्कमध्ये हरवलं
By देवेंद्र जाधव | Updated: October 1, 2024 08:52 IST2024-10-01T08:48:12+5:302024-10-01T08:52:50+5:30
निक्की तांबोळी तिकीट टू फिनालेची पहिली उमेदवार झाली आहे (Nikki tamboli, bigg boss marathi 5)

निक्की तांबोळी 'तिकीट टू फिनाले' मिळवून पोहोचली थेट बिग बॉसच्या फायनलमध्ये! सूरजला टास्कमध्ये हरवलं
बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये आता शेवटचा आठवडा बाकी आहे. अवघ्या काहीच दिवसांमध्ये बिग बॉस मराठीची ग्रँड फिनाले होणार आहे. या ग्रँड फिनालेमध्ये कोण जाणार याची सर्वांना उत्सुकता आहे. बिग बॉस मराठीमध्ये काल तिकीट टू फिनाले टास्क झाला. या टास्कमध्ये निक्की तांबोळी सूरजला हरवून थेट बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे घरातील सर्वांनी तिचं अभिनंदन केलंय.
निक्की तांबोळी गेली फायनलमध्ये
काल बिग बॉसने घोषणापत्र घरात पाठवलं. ते अंकिताने वाचलं. त्या पत्रात लिहिल्याप्रमाणे इनव्हेस्टमेंट बॉक्समध्ये ज्याचे पॉईंट्स जास्त असतील तो सदस्य तिकीट टू फिनालेचा उमेदवार होणार होता. अखेर ३०० कॉईन्स असल्याने निक्कीला थेट उमेदवारी मिळाली. पुढे टास्क जिंकून सूरजलाही तिकीट टू फिनालेची उमेदवारी मिळाली. शेवटी सूरज आणि निक्कीमध्ये टास्क झाला. या टास्कमध्ये बाजी मारुन निक्कीने तिकीट टू फिनाले जिंकत बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेमध्ये मजल मारली आहे.
निक्कीचं केलं सर्वांनी अभिनंदन
निक्की जेव्हा टास्क खेळत होती तेव्हा धनंजय पोवार अर्थात DP दादा तिचं लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करत होते. जान्हवी मात्र निक्कीला फूल्ल सपोर्ट करत होती. शेवटी निक्कीने एकाग्र होऊन खेळत कमीत कमी वेळात टास्कमध्ये बाजी मारली. सूरज जेव्हा टास्कमध्ये आला तेव्हा त्याला वेळ पण जास्त लागला आणि त्याच्यावेळी बझर सुद्धा जास्त वेळा वाजला. अशाप्रकारे निक्की बिग बॉस मराठीच्या फायनलमध्ये पोहोचली आहे.