अभिजीत सावंतच्या वाढदिवशी निक्की तांबोळीची पोस्ट, लाडक्या मित्राला शुभेच्छा देताना म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 16:03 IST2024-10-07T16:02:33+5:302024-10-07T16:03:11+5:30

निक्कीने अभिजीत सावंतसाठी पोस्ट शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Nikki Tamboli share post for Abhijeet Sawant wishing birthday | अभिजीत सावंतच्या वाढदिवशी निक्की तांबोळीची पोस्ट, लाडक्या मित्राला शुभेच्छा देताना म्हणाली...

अभिजीत सावंतच्या वाढदिवशी निक्की तांबोळीची पोस्ट, लाडक्या मित्राला शुभेच्छा देताना म्हणाली...

'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन अखेर संपला. सूरज चव्हाण हा यंदाच्या पर्वाचा विजेता, तर अभिजीत सावंत हा उपविजेता ठरला. तर निक्की तांबोळी ही  सेकेंड रनरअप ठरली. बिग बॉसचा उपविजेता ठरलेल्या अभिजीत सावंतचा आज 7 ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे.  'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर अभिजीतने त्याचा वाढदिवस कुटुंब आणि मित्रमंडळीसोबत साजरा केला. आपल्या खास मित्राच्या वाढदिवशी निक्की तांबोळी हिने पोस्ट शेअर केली आहे. 

निक्कीने अभिजीत सावंतसाठी पोस्ट शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने अभिजीतसोबतचा एक सुंदर फोटो इन्स्टाग्रावर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहलं, वाढदिवसाच्या शुभेच्छाअभिजीत! आपण बिग बॉसच्या घरात कायम एकमेंकाचा पाठिंबा राहिलोत, याचं मला कौतुक आहे. लोकांनी आपल्या मार्गावर कितीही अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरीही तुझ्या पाठिंब्याने ते आव्हानात्मक दिवस माझ्यासाठी अधिक सोपे झाले. आपल्या मैत्रीबद्दल आणि आपण ज्या प्रकारे एकत्र उभे राहिलो त्याबद्दल कृतज्ञ आहे". 

"बिग बॉस मराठी'च्या घरातनिक्की तांबोळी आणि अभिजीत सावंत यांच्यात पहिल्या दिवसापासूनच चांगली मैत्री पाहायला मिळाली होती. अभिजीत सावंत वेळोवेळी निक्कीची बाजू घेऊन वाद घालताना देखील दिसला होता. तर, अभिजीत सोबतच्या मैत्रीमुळेच निक्की आणि अरबाज यांच्यात कडाक्याची भांडण देखील झाली होती. मात्र, तरीही दोघांच्या मैत्रीत फूट पडली नव्हती. शिवाय या दोघांची मैत्री प्रेक्षकांनादेखील पसंत पडली होती. 

Web Title: Nikki Tamboli share post for Abhijeet Sawant wishing birthday