निक जोनसच्याही एक पाऊल पुढे! बायकोच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात मिरवणारा मराठमोळा अभिनेता कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 16:06 IST2026-02-20T15:47:40+5:302026-02-20T16:06:55+5:30

निक जोनसच्या 'मंगळसूत्र' ब्रेसलेटची चर्चा, पण 'या' मराठी अभिनेत्याने तर गळ्यातच घातलंय!

Nick Jonas Mangalsutra Bracelet Marathi Actor Prasad Jawade Wore With Mangalsutra Wife Amruta Deshmukh Name | निक जोनसच्याही एक पाऊल पुढे! बायकोच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात मिरवणारा मराठमोळा अभिनेता कोण?

निक जोनसच्याही एक पाऊल पुढे! बायकोच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात मिरवणारा मराठमोळा अभिनेता कोण?

Nick Jonas Mangalsutra Bracelet : मंगळसूत्र हा केवळ महिलांचा दागिना नसून ते पती-पत्नीमधील प्रेमाचं आणि आदराचं प्रतीक आहे. लग्नानंतर पत्नी पतीच्या लांब आयुष्यासाठी गळ्यात मंगळसूत्र घालतात. पण आता काळ बदलतोय. नुकताच 'देसी गर्ल' प्रियंका चोप्राचा पती निक जोनसचा एक व्हिडीओ समोर आला, ज्यामध्ये त्याच्या हातातील 'मंगळसूत्र ब्रेसलेट'ने सर्वांचे लक्ष वेधले. प्रियंकासाठी असलेलं त्याचं हे प्रेम पाहून जगभरातून कौतुक झालं. मात्र, तुम्हाला माहिती आहे का? एका लोकप्रिय मराठी अभिनेत्याने तर निकच्याही एक पाऊल पुढे जात चक्क आपल्या गळ्यात पत्नीच्या नावाचं मंगळसूत्र परिधान केलं आहे.

हा मराठी अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून प्रसाद जवादे आहे. प्रसादने १८ नोव्हेंबर २०२३ रोजी अभिनेत्री अमृता देशमुखसोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नात अनेक गोष्टींची चर्चा झाली, पण सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे प्रसादच्या गळ्यातील मंगळसूत्राने. केवळ अमृतानेच प्रसादच्या नावाचं मंगळसूत्र घातलं नाही, तर प्रसादनेही तिच्या नावाचं मंगळसूत्र घालून एक नवा आदर्श निर्माण केला. प्रसादचं हे मंगळसूत्र अगदी पारंपारिक नव्हतं. त्याने एका साखळीमध्ये (Chain) 'अमृता'च्या नावाचे पेंडंट लावले होते. लग्नाच्या विधीवेळी त्याने स्वतः आपल्या गळ्यात हे मंगळसूत्र घातले.

'बिग बॉस'मध्ये जीव जडला

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे हे दोघेही बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. बिग बॉसच्या घरातच त्यांना प्रेम झाले होते. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं. पण, त्यांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबूली दिली नव्हती. अखेर एकदिवस साखरपुड्याचा फोटो शेअर करत त्यांनी त्यांचं नातं जगजाहीर केलं. त्यानंतर १८ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रसाद आणि अमृता विवाहबद्ध झाले.


Web Title : निक जोनस से भी आगे! पत्नी के नाम का मंगलसूत्र पहनने वाले मराठी अभिनेता

Web Summary : मराठी अभिनेता प्रसाद जवादे ने पत्नी अमृता के नाम का मंगलसूत्र पहनकर मिसाल कायम की। बिग बॉस मराठी में मिले इस जोड़े ने नवंबर 2023 में शादी की और अनोखे अंदाज में अपने बंधन का जश्न मनाया।

Web Title : Marathi Actor Wears Wife's Name Mangalsutra, Surpassing Nick Jonas

Web Summary : Prasad Jawade, a Marathi actor, wore a mangalsutra with his wife Amruta's name, setting a new standard. The couple, who met on Bigg Boss Marathi, married in November 2023, celebrating their bond uniquely.