निया शर्मा पडली प्रेमात ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 20:37 IST2016-12-03T20:34:35+5:302016-12-03T20:37:14+5:30

हॉट टीव्ही अ‍ॅक्ट्रेस निया शर्मा ‘जमाई राजा’ आणि ‘एक हजारों मे मेरी बहना है’ या मालिकांमुळे घराघरांत पोहचली आहे. ...

Nia Sharma falls in love? | निया शर्मा पडली प्रेमात ?

निया शर्मा पडली प्रेमात ?

ट टीव्ही अ‍ॅक्ट्रेस निया शर्मा ‘जमाई राजा’ आणि ‘एक हजारों मे मेरी बहना है’ या मालिकांमुळे घराघरांत पोहचली आहे. खरं तर निया तिच्या हॉट अंदाजामुळेदेखील ओळखली जाते. त्यामुळे ती कोणाच्या प्रेमात आहे हा नेहमीच प्रश्न पडतो. आता आम्ही याचे तुम्हाला उत्तर देणार आहोत. यामुळे तिच्या काही फॅन्सचे मन तुटणार हे नक्की...

हो हे खरं आहे की, निया प्रेमात पडली आहे. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की, मी आता सिंगल नाही. जेव्हा तिला तू अजून सिंगल आहेस का, असे विचारण्यात आले तेव्हा तिने मी कोणाला तरी डेट करीत असल्याचे सांगितले. 

अर्थात त्या पुढचा प्रश्न तिच्या मनातील राजकुमार कोण हा होता. मात्र नियाने अतिशय चलाखीने या प्रश्नाला बगल देत म्हटले की, वास्तविक मी सिंगल आहे, परंतु माझा माइंड सिंगल नाही. मात्र डेटिंग करीत असल्याचा तिने खुलासा केल्याने ती सिंगल नसेल हे निश्चित आहे. 
कदाचित तिला तिचे रिलेशनशिप जाहीर करावेसे वाटत नसावेत, त्यामुळेच तिने या प्रश्नांना बगल दिली. 

Web Title: Nia Sharma falls in love?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.