​पुढचे पाऊल या मालिकेतील कल्याणी आणि अक्कासाहेब यांच्यापैकी कोण घेणार प्रेक्षकांचा निरोप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2017 11:50 IST2017-04-19T06:20:58+5:302017-04-19T11:50:58+5:30

पुढचे पाऊल ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील अक्कासाहेब आणि कल्याणी या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या ...

Next step Which of the series Kalyani and Akkasaheb will be taking away the audience? | ​पुढचे पाऊल या मालिकेतील कल्याणी आणि अक्कासाहेब यांच्यापैकी कोण घेणार प्रेक्षकांचा निरोप?

​पुढचे पाऊल या मालिकेतील कल्याणी आणि अक्कासाहेब यांच्यापैकी कोण घेणार प्रेक्षकांचा निरोप?

ढचे पाऊल ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील अक्कासाहेब आणि कल्याणी या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या प्रचंड लाडक्या आहेत. या दोन्ही व्यक्तिरेखांपैकी एक व्यक्तिरेखा प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे कळतेय. आजवर या मालिकेने दोन हजार भाग पूर्ण केले आहेत. या मालिकेतील करारी व्यक्तिमत्त्वाच्या अक्कासाहेब नेहमीच सुनेच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. त्यांनी सुनेचे शिक्षण, तिचा पुनर्विवाह यासाठी प्रयत्न केले. कायम चांगल्या गोष्टी करण्याला त्यांनी प्राधान्य दिले. त्यांनी पुरोगामी विचारांमधून स्वतःचे वेगळेपण निर्माण केले आहे. तर कल्याणीदेखील अक्कासाहेबांप्रमाणेच नेहमी कणखर, अनेक अडचणी येऊनही धीराने सामोरी जाणारी आहे. ती आपल्या कुटुंबाच्या हिताचा विचार करणारी अशी आहे. पण आता पुढचे पाऊल ही मालिका एक वेगळे वळण घेणार आहे.
सासू-सुनेच्या नात्यावर आधारित या मालिकेने नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. आता या मालिकेत बाब्या अक्कासाहेबांच्या कुटुंबाकडून बदला घेणार आहे. या हल्ल्यात अक्कासाहेब आणि कल्याणी या दोघांपैकी एकाचा मृत्यू होणार असल्याचे म्हटले जात आहे. आपले कुटुंब उद्धवस्त झाल्याच्या रागातून बाब्याने अक्कासाहेबांच्या विरोधात सूड घेण्याचे ठरवले आहे. त्याने बदला घेण्याचा संपूर्ण प्लानच तयार केला आहे आणि तो आता अक्कासाहेबांना मारणार आहे. मात्र हा त्याचा प्लान कल्याणीला कळल्यामुळे ती अक्कासाहेबांना वाचवण्यासाठी तिथे पोहोचणार आहे. त्यामुळे यात अक्कासाहेब की कल्याणी कोणाला ही गोळी लागते हे पाहाणे रंजक ठरणार आहे. 

Web Title: Next step Which of the series Kalyani and Akkasaheb will be taking away the audience?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.