'तू तेव्हा तशी' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, अनामिका सौरभच्या भावनांचा करेल का स्वीकार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 16:33 IST2022-05-31T16:12:21+5:302022-05-31T16:33:49+5:30
तू तेव्हा तशी हि मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची आवडती ठरली. हि मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे.

'तू तेव्हा तशी' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, अनामिका सौरभच्या भावनांचा करेल का स्वीकार?
तू तेव्हा तशी हि मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची आवडती ठरली. हि मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. सौरभच्या मनातील भावना तो अनामिकासमोर व्यक्त करू शकेल का? कॉलेजचं रियुनियन त्यासाठी निर्णायक ठरणार आहे.या रियुनियनची सध्या जोरदार तयारी चालू असल्याच प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळतेय. सौरभ अनामिकाला अजुन काही क्लु देतो. अनामिका काही त्या मुलीला ओळखु शकत नाही. सौरभ या सगळ्याचा आनंद घेत आहे.
प्रेक्षक मालिकेत आता पुढे पाहू शकतील कि रियुनियनचा दिवस येतो. सगळे मित्र अनेक वर्षांनंतर भेटतात. प्रत्येक मुलीमध्ये अनामिका तिला शोधण्याचा प्रयत्न करते. पण तिला यश मिळत नाही. इकडे वल्ली या रियुनियनला पोहोचते आणि सौरभ अनामिकासमोर त्याच्या मनातील गोष्ट बोलु नये यासाठी तिचे प्रयत्न सुरू होतात.
ती सौरभला गुंगीचं औषध देते. त्या औषधाचा परिणाम काही काळ राहतो पण सौरभ अनामिका समोर त्याच्या मनातील भावना बोलुन दाखवतो. ती मुलगी अनामिकाच आहे हे अनामिकाला कळणार आहे पण अनामिका सौरभच्या भावनांचा स्वीकार करेल का? हे पाहणं रंजक ठरेल.