'रात्रीस खेळ चाले'मध्ये अण्णांना होतोय शेवंताचा भास? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 07:15 IST2019-09-05T07:15:00+5:302019-09-05T07:15:00+5:30

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे.

New twist will come in ratris khel chale 2 marathi serial | 'रात्रीस खेळ चाले'मध्ये अण्णांना होतोय शेवंताचा भास? वाचा सविस्तर

'रात्रीस खेळ चाले'मध्ये अण्णांना होतोय शेवंताचा भास? वाचा सविस्तर

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या २ भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याचं बहुतांश श्रेय हे मालिकेतील कलाकारांनाही जातं. मुख्य म्हणजे 'रात्रीस खेळ चाले २', मधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे. ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. 

नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं की शोभा वर गोळी चालवल्यामुळे अण्णांना पोलीस पकडून नेतात अन कोठडीत टाकतात. एकीकडे शोभा दवाखान्यात आहे तिच्या साक्षीवर अण्णांची सुटका अवलंबून आहे. तर दुसरीकडे तुरुंगात अण्णांना भासभासचे खेळ सतावत आहेत.   कुरूप झालेली शेवंता मात्र बरी होऊन नव्या रूपात अण्णांना भेटायला पोलीस स्टेशनमध्ये येते. तिला पाहताच क्षणी अण्णा देखील चाट पडतात. ही नक्की शेवंता आहे की अण्णांना होणार भास आहे हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल. 

Web Title: New twist will come in ratris khel chale 2 marathi serial